शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत चोरीप्रकरणी सावंत रेस्टॉरेंटला ५२ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 22:32 IST

महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या भरारी पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : महावितरणच्या भरारी पथकाने छापा टाकून स्थानिक सावंग रेस्टॉरेंट मध्ये सुरू असल्याचे वीज चोरीचा प्रकार उजेडात आणला. सदर पथकातील अधिकाऱ्यांनी या रेस्टॉरेंट मालकाला विद्युत चोरी केल्या प्रकरणी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. शिवाय वेळीच दंड न भरल्यास पुढील कारवाईस सामोरे जावे लागेल याची माहितीही दिली.मोठ्या प्रमाणात विद्युतचा वापर असताना विद्युत देयक कमी येत असल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्थानिक विकास चौकातील सावंत रेस्टॉरेंटच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला. दरम्यान महावितरणच्या भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी थेट सावंग रेस्टॉरेंट गाठून बारकाईने पाहणी केली असता विद्युत चोरीचा प्रकार उघडकीस आला. सदर रेस्टॉरेंट हे दशरथ सावंत यांच्या मालकीचे असून सदर रेस्टॉरेंट व्यावसायिकाला विशेष भरारी पथकातील महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ५२ हजार ८०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहितीही दिली. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकातील सहा. कार्यकारी अभियंता धवड, सेलूचे उपविभागीय अभियंता मनोज खोडे आदींनी केली. विद्युत चोरीची माहिती अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :electricityवीजhotelहॉटेल