शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अन् रस्त्याची झाली चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 22:06 IST

शहरातील हृदयस्थान अशी ओळख असलेल्या वंजारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स या रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षश: चाळणी झाली आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांसह नागरिकांना त्रास : नाली अभावी रस्त्याला येते तळ्याचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील हृदयस्थान अशी ओळख असलेल्या वंजारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स या रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षश: चाळणी झाली आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी नाली नसून पावसाळ्याच्या दिवसात येथे पाणी साचून रस्त्याला चक्क तळ्याचे स्वरूप येते. याकडे स्थानिक नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी आहे.वाढता गुन्ह्याचा आलेख लक्षात घेता वर्धा शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून रामनगर पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. वंचारी चौक ते गजानन सायकल स्टोअर्स या मार्गावरील महाराणा प्रताप शाळेच्या आवारात सदर पोलीस स्टेशन सध्या कार्यरत आहे. रामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गावर दिवसभर छोट्या-मोठ्या वाहनांची बºयापैकी वर्दळ असते. परंतु, सध्या याच मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडलेले असून या मार्गावरून खड्डा चुकवून पुढील प्रवास करताना वाहनचालकांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. रात्रीच्या सुमारास सदर रस्त्यावरील खड्डे सहज दिसत नसल्याने मोठ्या अपघाताला आमंत्रण मिळत आहे.रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे. रस्त्याच्या दुतर्फा नालीच नसल्याने पावसाळ्याच्या दिवसात या मार्गाला तळ्याचे स्वरूप येते. परिणामी, या मार्गाने पायी ये-जा करणाºयांनाही चिखल तुडवतच नियोजित ठिकाणी जावे लागते. याच परिसरात चार शाळा आहेत. सदर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खड्ड्यांमुळे चाळणी झालेल्या रस्त्याचा फटका सहन करावा लागत आहे. वाहनचालकांसह नागरिक व विद्यार्थ्यांची समस्या लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग व न.प. बांधकाम विभागाने पुढाकार घेत रस्त्याच्या दुरूस्तीचे काम तात्काळ हाती घ्यावे, अशी मागणी आहे.शाळकरी मुला-मुलींची वाढविली डोकेदुखीरामनगर पोलीस ठाण्याच्या मार्गावर कमला नेहरू कन्या विद्यालय, महाराणा प्रताप शाळा, जगजीवनराम शाळा व एक कॉन्व्हेंट आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना पावसाळ्याच्या दिवसात चिखल तुडवतच शाळेत ये-जा करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून भरधाव वाहने इतरांची पर्वा न करता खड्ड्यांमधील पाणी उडवत जातात. खड्ड्यांमधील गढूळ पाणी विद्यार्थ्यांच्या अंगावर उडल्याचे अनेक उदाहरणे आहेत. एकूणच चाळणी झालेल्या रस्त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे.नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गावर खड्डेचखड्डेपुलगाव : नागपूर-मुंबई दरम्यान अंतर कमी होवून कमी वेळात वाहनाने मुंबईला पोहचता यावे यासाठी मुंबई औरंगाबाद नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग तयार करण्याचा निर्णय २३ डिसेंबर १९९९ च्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शासन निर्णय १५ जून २००२ अन्वये या प्रकल्पातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला उद्योजक म्हणून घोषीतही करण्यात आले. हा मार्ग विदर्भ मराठवाड्यातील बºयाचश: अविकसित भागातून जाणार असला तरी या रस्त्यावर सध्या ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. परिणामी, मोठ्या अपघातास नियंत्रण मिळत आहे. नागपूर ते घोटी या मार्गाची लांबी सुमारे ७०० कि़मी. असून या प्रकल्पावर जवळपास ७०० कोटी रूपयांचा निधी खर्च झाला आहे. हा मार्ग नागपूर-बुटीबोरी-वर्धा-पुलगाव-तळेगाव-शिंगणापूर-कारंजा-मालेगाव-मेहकर-शिंदखेडराजा-जालना-औरंगाबाद-वैजापूर-सिन्नर-घोटी-शहापूर होत मुंबई या शहरातून जातो. या मार्गामुळे नागपूर-मुंबई हे अंतर ५० कि.मी.ने कमी होत आहे. हा मार्ग अनेक औद्यागिक शहरांना जोडणारा आहे. या मार्गाचा बहुतांश भाग चौपदरी होणार असल्याचा गाजावाजाही झाला होता. या विकास कामात हजारो वृक्षही तोडण्यात आली. पण, सध्या या मार्गावरील जीवघेणे खड्डे वाहनचालकांची डोकेदुखी वाढवत आहेत. खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक अपघात झाल्याची बरीच उदाहाणे आहेत. या मार्गावरील अनेक ठिकाणची गिट्टी उघडी पडली असून नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी आवश्यक असलेले सूचना फलक लावलेले नाहीत. खड्डेमय झालेल्या या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी संबंधीत प्रशासनाने तात्काळ योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.