शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

सावंगी ठाणेदाराकडून जि. प. उपाध्यक्षांना अपमानास्पद वागणूक

By admin | Updated: December 31, 2016 01:57 IST

सावंगी (मेघे) परिसरात सुरू असलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुरुवारी सायंकाळी सावंगीच्या सरपंचाचे

विलास कांबळेंना जीवे मारण्याच्या धमकीचे प्रकरण : तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते ठाण्यात वर्धा : सावंगी (मेघे) परिसरात सुरू असलेल्या भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात गुरुवारी सायंकाळी सावंगीच्या सरपंचाचे पती किशोर दौड व त्याच्या काही सहकाऱ्यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणाची रीतसर तक्रार देण्याकरिता सावंगी पोलीस ठाण्यात गेलो असता ठाणेदार संतोष शेगावकर यांनी चक्क दारूड्या म्हणून गेट आऊट म्हटले. तसेच दुसऱ्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली, याप्रकरणी सदर ठाणेदाराच्या उद्दामपणाला चार दिवसात लगाम लावा अन्यथा कायदेशीर मागार्ने आंदोलन करणार, असा इशारा जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिला. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांना निवेदन देत चर्चा केली. यावेळी सावंगी येथील ठाणेदार शेगावकर यांची सावंगी येथून उचलबांगडी करण्याची मागणी केल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेला जि.प. सदस्य राणा रणनवरे यांची उपस्थित होते. त्यांनीही या घटनेचा निषेध नोंदविला. विलास व किशोर दौडवर अनेक गुन्हे ४या प्रकरणात असलेला विलास दौड याच्यावर भादंविच्या ४५७, ४३६, ३२५, ३४, ४२०, ४४८, ४२७, ३२४, ३४ तसेच मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहे. तर किशोर दौडवर ३२४, ३४१, १४३, ३९४, ५०६, ४२, १४७, १४८, १४९, ३०७ ३२३, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल असल्याची माहिती कांबळे यांनी दिली. असे असताना त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात येत नाही. दौड आणि ठाणेदार यांच्यात आर्थिक व्यवहार असल्याचा गंभीर आरोपही यावेळी कांबळे यांनी केला. ठाणेदाराची गुन्हेगारी प्रवृत्तीला अशीही साथ ४सावंगी (मेघे) येथे पोलीस ठाणे येण्यापूर्वी हा परिसर सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत होता. सेवाग्रामचे तत्कालीन ठाणेदार धनंजय सायरे यांनी दौड यांच्या आशीर्वाद हॉटेलात धाड घालून लाखो रूपयांची दारू जप्त केली होती. येथे अद्यापही दारू विक्री होत असताना सावंगी ठाणेदारांनी मात्र गेल्या वर्षभरात एकही कारवाई केली नाही. उलट खुद्द ठाणेदारच त्या हॉटेलात त्यांना बसून अनेकांनी बघितले आहे, असा गंभीर आरोप विलास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केला. पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांवर अदखलपात्र गुन्हा ४या प्रकरणात आलेल्या दोन्ही तक्रारीवरून एकमेकांविरूद्ध अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोघांनाही समज देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.