शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
2
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
3
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
4
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
5
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
6
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
7
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
8
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
9
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
10
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
12
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
13
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
14
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
15
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
16
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
17
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
18
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
19
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
20
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ

सरपंचाच्या पतीकडून सदस्याला मारहाण

By admin | Updated: June 24, 2014 00:02 IST

समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला.

वर्धा : समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच महिलेच्या पतीने ग्रा.पं. सदस्यास मारहाण केली. या विरोधात तक्रार दाखल केली असता अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला. यानंतर ग्रा. पं. सदस्यास शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याने जीवितास धोका निर्माण झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची औपचारिकताच पूर्ण केल्याने अद्याप कारवाई झाली नसल्याने ग्रा. पं. सदस्य रोशन लामसोंगे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले.निवेदनानुसार, जाम येथे रिना जांगडेकर या सरपंच पदावर असून तिचा पती अमोल जांगडेकर हा पत्नीच्या सरपंचपदाचा गैरवापर करीत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. अमोल आधी रॉकेलचा धंदा करीत होता. त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहे. ९ जून रोजी १२.३० वाजता ग्रा. पं. कार्यालयात वार्ड नं. १ मध्ये पाण्याची समस्या असल्यामुळे ग्रा.पं. सदस्य रोशन लामसोंगे हे सचिवाला भेटायला गेले. यावेळी अमोलने आपण सरपंच असल्याचे म्हणत सचिवाला कशाला विचारता, जे विचारायचे आहे ते मला विचारा असे म्हणत एकाऐकी रोशनला लाथाबुक्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. यात त्याच्या डोळ्याला जबर जखम झाली. हा प्रकार सचिवासमोर घडला असताना त्यांनीही कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रा.प.सदस्य लामसोंगे यांनी घटनेची तक्रार ९ जून रोजी समुद्रपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. पोलिसांनी जांगडेकर विरुद्ध भादंविच्या कलम ३२३, ५०४, ५०६ अन्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला. व अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा असल्याने आपणास कोर्टात जाण्याची समज देण्यात येते. अशी एन.सी. पावती पोलिसांनी दिली. परंतु अद्यापही जांगडेकर विरोधात कठोर पावले उचलण्यात आलेली नाही. त्यामुळे पत्नीच्या सरपंचपदाचा पदाचा गैरवापर करीत असलेल्या अमोल जांगडेकरविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी लामसोंगे यांनी केली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी निवेदन सादर करण्यात आले आहे. तसेच निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अजय चौधरी यांना देण्यात आली आहे. पदाचा असा गैरवापर करीत असलेल्या गुंंड प्रवृतीच्या इसमावर कठोर पावले उचलण्याची मागणी त्यांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)