शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच पत्नी व सदस्य पती पायउतार

By admin | Updated: April 26, 2017 00:21 IST

शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया श्याम मोहळ आणि सदस्य श्याम मोहोड या ...

सिंदी(मेघे) ग्रामपंचायतीतील प्रकार : अपर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय वर्धा : शहरालगत असलेल्या सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया श्याम मोहळ आणि सदस्य श्याम मोहोड या पती-पत्नीने त्यांच्या घरातील एक खोली अंगणवाडीकरिता भाड्याने देत भाडे वसुल करून पदाचा दुरूपयोग केल्याची तक्रार गावातील अरुण देविदास येसणकर यांनी केली होती. त्या तक्रारीची चौकशी केली असता मोहोड दाम्पत्यावर असलेले आरोप सिद्ध झाल्याने त्यांना पदावरून पायउतार करण्याचा निर्णय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. प्राप्त माहितीनुसार, सिंदी ग्रामपंचायतीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्य म्हणून सुप्रिया मोहोड तर त्यांचे पती श्याम मोहोड निवडूण आले. येथे असलेल्या आरक्षणानुसार सुप्रिया मोहोड सरपंच झाल्या. त्या पदावर असताना त्यांनी त्यांच्या घरी असलेली एक खोली २६ क्रमांकाच्या अंगणवाडीकरिता १००० रुपये महिन्याने अंगणवाडी क्रमांक २६ करीता भाड्याने देत आपल्या पदाचा दुरूपयोग केला. या संदर्भात अरुण येसणकर यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. प्रशासनाकडे आलेल्या या तक्रारीची चौकशी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी इवनाथे यांनी केली असता केलेले आरोप सत्य असल्याचे निदर्शनास आले. यावरून सरपंचाने केलेले कृत्य हे त्याच्या पदाचा दुरूपयोग करण्यास कारण ठरत असल्याने त्यांच्यावर मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १६ नुसार कार्यवाही केली. यात सरपंच सुप्रिया मोहोड आणि सदस्य श्याम मोहोड यांना पदावरून पायउतार केले. हा निर्णय १८ एप्रिल रोजी देण्यात आला. या तारखेपासून सिंदी (मेघे) येथील सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त असल्याचे समोर आले आहे.(प्रतिनिधी)