शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

गिरडच्या सरपंचासह दोन सदस्यांवर अपात्रतेची तलवार

By admin | Updated: June 9, 2017 02:00 IST

येथील सरपंच चंदा कांबळे व सदस्य शुभांगी काटेखाये आणि शारदा बोधे या संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत.

प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे : सुनावणीकडे गावकऱ्यांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कगिरड : येथील सरपंच चंदा कांबळे व सदस्य शुभांगी काटेखाये आणि शारदा बोधे या संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत. निवडणुकीदरम्यान त्यांनी घरी शौचालय असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी शौचालयाच्या नावावर १२ हजार रुपयांची उचल केल्याचे विरोधकांनी उघड केले. त्याची तक्रार जिल्हाधिकारीकाऱ्यांकडे केली असून यावर येत्या २० जून रोजी सुनावणी होणार आहे. याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. सरपंच व त्यांच्या दोन सहकारी सदस्यांनी केलेल्या हा अपहार विरोधी पक्षाचे सदस्य अश्विनी दाभणे व हमीद पटेल यांनी उघडकीस आणला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत सरपंच चंदा कांबळे यांनी पती प्रभाकर कांबळे यांच्या नावावर १२ हजार तर सदस्य शारदा बोधे या सदस्याने श्यामराव बोधे यांच्या नावे १२ हजार तसेच शुभांगी काटेखाये यांनी सासरे चंद्रभान काटेखाये यांच्या नावावर १२ हजार रुपयांची उचल केल्याचे तक्रारीत नमूद आहे. ही रक्कम शासनाच्या एसबीएम योजनेतून उचलल्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे. सरपंच व सदस्यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे या पदाधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी होत आहे. या प्रकरणी अप्पर जिल्हाधिकारी यांनी सदर सदस्यांना मुंबई अधिनियम १९५८ चे १४(ग) नुसार नोटीस बजावून २० जून रोजी सुनावणीस बोलावले आहे. येथे होणाऱ्या सुनावणीकडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. सदर सदस्याचे शौचालय जीर्ण झाले. त्यामुळे ते पाडून शासनाच्या योजनेतील १२ हजार रुपये यादीत नाव असल्याने त्यांनी नवीन शौचालय बांधण्याचा प्रयत्न केला. यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. - दत्तात्रय दिवटे, ग्राम विकास अधिकारी ग्रा.प. गिरड