शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

सराफांचा जिल्हा कचेरीवर मोर्चा

By admin | Updated: March 15, 2016 03:53 IST

गत १४ दिवसांपासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सराफा व्यावसायिकांनी अबकारी कराच्या विरोधात बंद पुकारला आहे.

वर्धा : गत १४ दिवसांपासून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर सराफा व्यावसायिकांनी अबकारी कराच्या विरोधात बंद पुकारला आहे. या बंद दरम्यान सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात विदर्भातील पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. यानंतर येथीन एका कार्यालयात व्यावसायिकांची सभा झाली. अर्थसंकल्पात सराफा व्यावसायिकांवर अतिरिक्त अबकारी शुल्क आकारण्यात आले. या शुल्काविरोधात त्यांच्याकडून अनेकवेळा निवेदने सादर करण्यात आली; मात्र तो कर तसाच ठेवण्यात आला. यामुळे सुवर्णकारांनी १ मार्चपासून बंद पुकारला आहे. यात शासनाचे लक्ष वेधण्याकरिता सुवर्णकारांकडून विविध आंदोलने करण्यात आली; मात्र त्याचा काहीच उपयोग होत सराफा व्यावसायिक संताप व्यक्त करीत आहे. याच आंदोलनादरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा न्यायालयाच्या मुख्यद्वाराजवळ अडविण्यात आला. या मोर्चात विदर्भासह जिल्ह्यातील सुवर्णकार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चा परत येवून त्याचे रुपांतर एका सभेत झाले. येथे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी सदस्यांना मार्गदर्शन करून मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे सांगितले.