शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम साने गुरुजींनी केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:34 IST

गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.

ठळक मुद्देअवधूत म्हमाणे : साने गुरूजी कथामाला अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधी, विनोबाजींचे साने गुरुजी शिष्य होते. साने गुरूजी मुलांचेच नव्हे तर सर्वांचे होते. कथारूपाने गुरुजींना सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असून बालकांचे चारित्र्य घडविण्याचे काम गुरुजींनी केले. यामुळे कार्यकर्ता प्रशिक्षण व प्रकल्प तयार करण्याचे आवाहन कथामालेचे अध्यक्ष अवधूत म्हमाणे यांनी केले.गांधी १५० मध्ये साने गुरुजी कथामालेचे अधिवेशन आयोजित केले आहे. यावेळी ते बोलत होते. अ.भा. साने गुरूजी कथामाला कार्यकर्ता प्रशिक्षणाचा समारोप शुक्रवारी झाला. यावेळी अवधूत म्हमाणे, डॉ. उल्हास जाजू, रवींद्र रूख्मिणी पंढरीनाथ व सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.म्हमाणे पूढे म्हणाले की, गुरूजींनी ज्या गोष्टी लिहिल्या, त्या सर्व वैचारिक व प्रेरणादायी आहे. आज त्या सर्व बालक, युवकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. डॉ. जाजू यांनी गांधी विचार व गोष्टी सांगण्याच्या नव्हे तर समजून घेण्याची गरज आहे. पर्यावरणाचा प्रश्न आज निर्माण झाला; पण तो होऊ नये यासाठी गांधीजींनी जो कार्यक्रम दिला, तो समजण्याची गरज आहे, असे सांगितले. रवींद्र रूख्मिनी पंढरीनाथ म्हणाले की, मी साने गुरूजींच्या गोष्टी सांगत असे; पण आज या गोष्टी सांगताना गांधीजींच्या विचारांच्या पे्रमात पडलो. आजही गांधीजींविषयी विष पसरविले जाते. खरा गांधी सांगून अमृत पसरविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. गांधीजींना चरखा, स्वच्छता यात बंदीस्त करण्यात आले. वास्तवात तर गांधी त्यापलीकडे आहे. गांधींना मारण्यासाठी ३२ वर्षांपासून प्रयत्न सुरू होता. गांधीजींनी देशातील सर्व स्तरातील लोकांना जोडले, म्हणून त्या काळी काँग्रेसमध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकतेने राहिले. काँग्रेसचा जनाधार वाढला. संघाचा तर स्वातंत्र्य लढाईत कुठेच सहभाग नव्हता. उलट विरोध होता. यातूनच गांधी हत्या झाली. गुरूजींच्या कथा सर्वांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले. यवतमाळचे बाळ सरोदे यांनी भक्तातील वेगळेपणा पाहिल्यास मूळ पुरूष गांधीजी दिसते. मनातील विरोधात्मक भिंती पाडा, गांधीजी व साने गुरुजींना समजून घ्या, असा आग्रह त्यांनी धरला. प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी तर संचालन डॉ. शोभा बेलखोडे यांनी केले.