शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांनी तोडले कोल्हापूर मार्गावरील बॅरिगेट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:00 IST

वर्धा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून काही वाळू माफिया सध्या वाळूची चोरी करीत आहेत. त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून पाठिशी घातल्या जात असल्याने वाळू माफियांची हिम्मतही वाढली आहे. काही वाहन चालक वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल वाचविण्यासाठी याच चोर मार्गाचा वापर करतात. तर याच चोर रस्त्याने सध्या काही वाळू माफिया दिवसाला व रात्रीला वाळूची वाहतूक करतात.

ठळक मुद्देमनमर्जीला आले ऊत

लोकमत न्यूज नेटवर्कभिडी : अवैध उत्खनन करून वाळूची चोरी आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या आहेत. परंतु, पोलीस आणि महसूल विभागाच्या दुर्लक्षीत धोरणामुळे देवळी तालुक्यात वाळूमाफियांच्या मनमर्जीला ऊत आले आहे. अवजड वाहनांची ये-जा होऊ नये म्हणून कोल्हापूर (राव) मार्गावरील बॅरिगेट्स बसविण्यात आले होते. परंतु, हेच बॅरिगेट्स काही वाळू माफियांनी तोडल्याने ‘शासकीय अधिकाऱ्यांपेक्षा वाळू माफियांचे पारडे जड काय’ अशी चर्चा सध्या परिसरात होत आहे.वर्धा नदीच्या पात्रात अवैध उत्खनन करून काही वाळू माफिया सध्या वाळूची चोरी करीत आहेत. त्यांना राजकीय पुढाऱ्यांकडून पाठिशी घातल्या जात असल्याने वाळू माफियांची हिम्मतही वाढली आहे. काही वाहन चालक वर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल वाचविण्यासाठी याच चोर मार्गाचा वापर करतात. तर याच चोर रस्त्याने सध्या काही वाळू माफिया दिवसाला व रात्रीला वाळूची वाहतूक करतात. अवजड वाहनांची या मार्गाने ये-जा होऊ नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने कोल्हापूर (राव) मार्गावर लोखंडी पोल बसविण्यात आले होते. पण हेच बॅरिगेट्स वाळू माफियांनी तोडल्याने बॅरिगेट्सवर खर्च झालेला शासकीय निधी वाया गेला आहे. या बॅरिगेट्सची वेळीच दुरूस्ती करावी, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांसह नागरिकांची आहे.रोहणी, तांबा शिवारातून आणली जाते वाळूवाळू माफियांनी रोहणी तसेच तांबा शिवारात आपले पाय मजबुत केले आहे. याच ठिकाणी सध्या बोट, पोकलँड आणि जेसीबीच्या सहाय्याने नदी पात्रात उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. वाळू माफिया इतक्यावरच थांबलेले नसून त्यांच्याकडून चोरीच्या वाळूची वाहतूक तोडलेल्या बॅरिगेट्च्या मार्गाचा वापर करून केला जात आहे. असे असतानाही देवळीचे तालुका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

सीसीटीव्ही चुकविण्यासाठी खटाटोपवर्धा-यवतमाळ मार्गावरील टोल नाक्यावर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. याच सीसीटीव्हीत वाळू भरलेल्या वाहनांचे चित्रिकरण होऊ नये म्हणून वाळू माफिया आपली वाळू भरलेली वाहने कोल्हापूर (राव) मार्गाने नियोजित ठिकाणी नेत असल्याचे बोलले जात आहे. कोल्हापूर (राव) मार्गावरील तोडलेले बॅरिगेट्स दुरूस्त करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यास वाळू माफियांचे पितळ उघडे पडेल, हे तितकेच खरे.

टॅग्स :sandवाळूmafiaमाफिया