शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

अंतोरा घाटातून पोकलॅन्डद्वारे रेती उपसा

By admin | Updated: March 12, 2017 00:35 IST

शासनाला दोन कोटी रुपये अदा करून घेतलेल्या अंतोरा रेतीघाटात पोकलॅन्ड मशीन लावून अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू केला आहे.

तहसील प्रशासन कारवाई करणार : नदीचे पाणी दूषित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आष्टी (शहीद) : शासनाला दोन कोटी रुपये अदा करून घेतलेल्या अंतोरा रेतीघाटात पोकलॅन्ड मशीन लावून अवैधरित्या रेतीचा उपसा सुरू केला आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचा आरोप अंतोरा येथील ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत नदी बचाव संघर्ष समितीने तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे. तहसील प्रशासनाने कडक उपाययोजना करून त्वरित कारवाई करण्याची ग्वाही दिली आहे. अंतोरा रेतीघाटाचा तब्बल सहा वर्षांनी लिलाव झाला आहे. घाटात मुबलक वाळू उपलब्ध आहे. रेती विकत घेणारे ठेकेदार लवकेश ट्रेडींग कंपनी मोर्शी जि. अमरावतीचे प्रमोद गोमकाळे यांनी रेतीची विक्री सुरू केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रेती गरम येत आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून पोकलँड लावले आहे. यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन आरोग्यास धोका निर्माण झाल्याचा आरोप समितीच्या सदस्यांनी केला आहे. या घाटातून रेतीची वाहतूक होत असताना बाजूच्या सर्व्हेमधून उत्खनन केले जात असल्याचा आरोप आहे. वनविभागाच्या जागेतून रस्ता केला असल्याचाही आरोप होत आहे. पोकलँडमधून डिझल गळतीमुळे पाण्यावर तवंग आल्याचेही नमूद आहे. दिवसभरात १५० ते २०० ट्रकची वाहतूक करून शासनाला चुना लावला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. या घाटाला तहसीलदार सीमा गजभिये, नायब तहसीलदार मृदुला मोरे, वनाधिकारी अमोल चौधरी यांनी भेट दिली. यात रस्त्याचे मोजमाप केले असता वनविभागाच्या हद्दीत येत नाही; पण घाटातील अवैध उपसा आढळल्यास कारवाई करणार असल्याचे सांगितले. प्रत्येक रेतीच्या ट्रकला रॉयल्टी देण्याचे आदेश दिले. यात रॉयल्टी नसल्यास ट्रकला ४२ हजार तर ट्रॅक्टरला २१ हजार रुपये दंड ठोठावणार असल्याचे सांगितले. रेतीचा साठा व विक्री करताना ग्रामस्थांना कुठलाही त्रास होता कामा नये, असे आदेश त्यांच्याकडून देण्यात आले आहेत. रेती घाटातील सर्व घडामोडींवर ग्रामस्थ लक्ष ठेवून आहेत. अंतोरा येथील राजेश ठाकरे, डॉ. नरेंद्र देशमुख, किशोर कडू, पंकज वलगावकर, विनोद उमाळे, अतुल वानखडे, पंकज ठाकरे यांनी तहसीलदार सीमा गजभिये यांना लेखी निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती उपविभागीय महसूल अधिकारी, खासदार रामदास तड, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठविण्यात आल्या आहेत. यात पर्यावरण विभागाच्या नियमांचे उल्लंघन करणारे रेतीघाटधारक व त्यांचे सहकारी यांच्यावर कारवाई करावीे. वाहतुकीकरिता गावातून रस्ता न देता पर्यायी रस्ता द्यावा, अन्यथा नदी बचाव संघर्ष समिती उपोषण करेल, असा इशारा देण्यात आला आहे.(तालुका प्रतिनिधी) रेती वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांवर अवकळा अंतोरा येथील रेती घाटाचा तब्बल सहा वर्षांनंतर लिलाव करण्यात आलेला आहे. यामुळे नदी पात्रात वाळूसाठा मुबलक असल्याने कंत्राटदाराकडून अतिरेकी उपसा केला जात असल्याचे तक्रारी नमूद करण्यात आले आहे. यामुळे रेतीची वाहतुकही अधिक होत असून गावातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. यामुळे रेतीच्या वाहतुकीसाठी गावाबाहेरून पर्यायी रस्ता देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तहसील प्रशासनाने घाट तथा तयार केलेला रस्ता वन विभागाच्या हद्दीत आहे वा कसे, याबाबत पाहणी केली आहे. शिवाय नियमोल्लंघन न करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले आहेत.