शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

एकाच घाटावर होणार विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 21:34 IST

लवकरच सार्वजनिक, घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी पवनारला धाम नदीत हजारो बाप्पांचे विसर्जन होत असते. शहरामध्ये पर्यावरण पुरक विसर्जनाची सोय शासन पालिका प्रशासन व सामाजिक संस्थेद्वारे केली जात असल्यामुळे गतवर्षीपासून घरगुती गणपतीच्या विसर्जनाची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी नदीचे आकर्षण व हौस मौजेसह विसर्जन करण्यासाठी अनेकांची पवनारला प्रथम पसंती असते.

ठळक मुद्देपोलीस यंत्रणा सज्ज : मंडळाच्या सदस्यांना नदीत उतरण्यास मनाई

लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : लवकरच सार्वजनिक, घरगुती गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी पवनारला धाम नदीत हजारो बाप्पांचे विसर्जन होत असते. शहरामध्ये पर्यावरण पुरक विसर्जनाची सोय शासन पालिका प्रशासन व सामाजिक संस्थेद्वारे केली जात असल्यामुळे गतवर्षीपासून घरगुती गणपतीच्या विसर्जनाची संख्या काही प्रमाणात घटली असली तरी नदीचे आकर्षण व हौस मौजेसह विसर्जन करण्यासाठी अनेकांची पवनारला प्रथम पसंती असते.सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यांतर्गत धाम नदी तिरावर पर्यटन विकासाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यावर्षी नंदीघाट परिसर हा विसर्जनासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. दरवर्षी या घाटावर घरगुती गणपती विसर्जन व्हायचे तर छत्री परिसरात सार्वजनिक गणपतीचे विसर्जन केल्या जात होते. परंतु नंदीघाट पर्यटनाच्या कामामुळे बंद असल्याने सर्व बाप्पांचे विसर्जन छत्री घाटावरच होणार असल्याचे सेवाग्राम पोलीस स्टेशनचे निरीक्षक संजय बोढे यांनी सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे सोळा सार्वजनिक गणपती व सेवाग्राम परिसरातील सहा सार्वजनिक गणपती धाम तिरावर विसर्जनासाठी येणार आहेत. वर्धा परिसरातील माहिती अजून मिळाली नसल्याने त्यांनी सांगितले बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आली असून त्याकरिता १० पोलीस अधिकारी व ५० पोलीस होमगार्ड तैनात करण्यात येणार आहे. त्याकरिता एकेरी वाहतुक राहणार असून आश्रमकडे जाणाऱ्या लहान पुलावरून वाहने येतील व मोठ्या पुलावरून बाहेर निघण्याचा मार्ग असणार आहे. अप्रिय घटना टाळण्यासाठी पवनारातील पट्टीचे पोहणाºयांच्या लाईफ गार्ड म्हणून वापर करण्यात येणार आहे. त्यांना लाईफ जॅकेट व टी शर्ट पुरविण्यात येणार आहे. मचान उभारून त्यावरून दुर्बिणीद्वारे पाहणी करण्याची यंत्रणा सुध्दा उभारण्यात येणार आहे.कुंडाचे बांधकाम अर्धवट स्थितीतपर्यटन विकासाच्या कामामध्येच पर्यावरणपूरक गणेश विसर्जन कुंड उभारण्यात येत असला तरी त्याचे काम अर्धवट असल्यामुळे यावर्षी त्याचा उपयोग होणार नसल्याचे दिसून येते. पुढत्या वर्षी मात्र त्याच कुंडात विसर्जन करण्यात येईल.पोलीस यंत्रणा सज्ज असून विसर्जनाच्या वेळेस कुठलीही अप्रिय घटना घडू नये म्हणून दक्ष राहणार आहे., ग्रा.पं. प्रशासनाकडून छत्री परिसरातील विसर्जन स्थळावरील कुंडातील गाळ साफ करून घेतला असून कुठल्याही मंडळाच्या कार्यकर्त्याला विसर्जनासाठी नदीत उतरून दिले जाणार नाही. पोलिस मित्र व नियुक्त केलेले पट्टीचे पोहणारे विसर्जनाचे कार्य पार पाडतील.- संजय बोढे, पोलीस निरीक्षक, सेवाग्राम.