शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

बौद्ध बांधवांची महामानवाला मानवंदना

By admin | Updated: April 15, 2016 02:33 IST

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती

भीममय वातावरण : विविध वॉर्डावॉर्डातून निघालेल्या मिरवणुकांनी वर्धा दुमदुमलेवर्धा : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ चा शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून असंख्य आंबेडकरी जनतेनी महामानवाला अभिवादन केले. बाबासाहेबांची शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव जिल्ह्यात सर्वत्र उत्साहपूर्ण वातावरण आणि शांततेत पार पडला. वर्धेसह जिल्ह्यातील काही शहरांमध्ये ‘जय भीम’चा नारा देत ‘जबतक सुरज चाँद रहेगा, बाबासाहेब तुम्हारा नाम रहेगा’च्या घोषणा देत निळे झेंडे व पंचशील ध्वज हातात घेऊन निघालेल्या बाईक रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत होत्या, तर सायंकाळी वॉर्डावॉर्डातून मिरवणुकीच्या माध्यमातून बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांच्या स्मृतींना आदरांजली वाहिली. याप्रसंगी वातावरण निळाईने व्यापून गेले होते. वर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. आंबेडकर चौकातील पोलीस ग्राऊंड येथे सतत चार दिवस प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. सकाळपासूनच वर्धेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी जनेतेची रीघ लागली होती. रखरखते उन्हं असतानाही दिवसभर ही गर्दी कायम होती. दरम्यान, खा. रामदास तडस, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मीणा, निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार व विवेक इलमे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनीही बाबासाहेबांना अभिवादन केले. जयंती महोत्सवानिमित्त डॉ. आंबेडकर पुतळा चौकाला निळ्या पताकांनी आकर्षक सजविण्यात आले होते. पुतळ्याच्या चबुतऱ्याला निळ्या व पांढऱ्या फुग्यांच्या कमानी लक्षवेधत होत्या. सभोवताल विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संघटनाच्यावतीने आंबेडकरी जनतेसाठी विविध स्टॉल लावण्यात आले होते. शहरातील मुख्य मार्गावर स्वागतद्वार आणि पताका लावल्याने शहरातील वातावरण भीममय झाले होते. सायंकाळी शहरातील व सभोवतालच्या गावांमध्ये निघालेल्या मिरवणुका डॉ. आंबेडकर चौकात एकवटल्या. हजारोच्या संख्येने बौद्ध बांधवांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. अनेकांनी मेणबत्ती लावून अभिवादन केले. उमेश म्हैसकर यांनी वैशाली नगरातून बाईक रॅली काढली. ही रॅली प्रबुद्ध नगरातून मार्गक्रमण करीत शहरातील मुख्य मार्गाने फिरवून डॉ. आंबेडकर चौकात दाखल होताच बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. या रॅलीत महिलावर्ग दुचाकीसह सहभागी झाल्या होत्या. रॅलीत निळे फेटे लावलेले भीमसैनिक लक्ष वेधून घेत होते.दिवसभर शहरातील विविध भागातून भीमसैनिकांनी बाईक रॅली काढल्या. हातात निळे झेंडे घेऊन शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत निघालेल्या या बाईक रॅली विशेष आकर्षण ठरल्या होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्यावतीने चार दिवस विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम पार पडले. यासाठी उत्सव समितीचे संयोजक प्रमोद राऊत, समितीचे अध्यक्ष विशाल रामटेके, महासचिव रत्नमाला साखरे, कोषाध्यक्ष सुरेंद्र पुनवटकर, सल्लागार समितीचे दिनेश सवाई, विजय आगलावे, निरज गुजर, डॉ. रवीदत्त कांबळे, अ‍ॅड. प्रेम ताकसांडे, शारदा झामरे, अतुल दिवे, अशोक खनाडे, अरविंद निकोसे, सफदर अली, अ‍ॅड. राजेश थुल, प्रकाश पाटील, अरविंद मेहरा, रवी जगताप, वसंत भगत. सोनू कांबळे, महेंद्र मुनेश्वर, उमेश जिंदे, बंटी गोस्वावी, मिलिंद ढाले, प्रवीण पोळके, जयकांत पाटील, रमेश जामलेकर, प्रवीण शेंडे, निशिकांत गोटे, दिनेश थुल, राहुल झामरे, अनिल खडतकर, विजय नगराळे, भास्कर भगत, धम्मपाल शंभरकर, प्रदीप भगत. प्रकाश कांबळे, शेख परवीन उपाध्यक्ष नितीश कुंभारे, बंडू फुलमाळी, पिंटू खंडारे, सलमान खान, सहसचिव सुरज बडगे, पंकज लभाने, अमित डांगे यांच्यासह राजू वैद्य, असिफ कुरेशी, प्रकाश कोरडे, संदेश भित्रे, धम्मा सेलकर, मंगेश सूर्यवंशी, दीपक कंजर, अहमद पठाण, आशिष सोनटक्के, संतीश इंगळे, कुणाल आगरकर, राहुल पिंपळकर, समाधान पाटील, सोनू सहारे, प्रशांत रामटेके, परवेज खान, सुमित गजभिये, संदीप नगराळे, विकास झंझाळ, बादल शेळके, अमर कांबळे, पप्पू लोहवे, विनय भगत, आनंद गायकवाड, चंदू डोफे, उमेश मेश्राम, आदित्य मांदाडे, अविनाश नागदेवे, अरविंद भगत, देवानंद तेलतुंबडे, अमोल थुल, मंगेश नगराळे, अक्षय फुलझेले, विशाल नगराळे, प्रणय ताकसांडे, प्रणित मानकर, आकाश पाझारे, मयूर डेकाटे, आशिष जांभुळकर, प्रशिल उके, अमरदीप कांबळे, चिंटु इंगळे, पंकज मून, राहुल पाटील, अभिनाथ वाघमारे, अमोल फुलझेले, आनंद गायकवाड, रमेश भगत, आकाश मंदाडे, जयशील पानबुडे, पवन धवमे, सिद्धांत मून, चिंटु गोटे, सौरभ होतोले व वैभव पाटील या सदस्यांनी हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता मागील १५ दिवसांपासून अहोरात्र परिश्रम घेतले.(जिल्हा प्रतिनिधी)