शिक्षण सभापती रुग्णालयातच : जामिनाकरिता अर्ज दाखल करणारवर्धा : लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेतील शिक्षण सभापती मिलिंद भेंडेसह महिलेच्या तक्रारीवरून पत्नीसह साळा व साडभावावर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांना प्रथमश्रेणी न्यायालयाने सोमवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती आहे. तर भेंडेच्या तक्रारीवरून खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ‘त्या’ शिक्षिकेलाही अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. मिलिंद भेंडे याने लंैगिक शोषण केल्याची तक्रार एका शिक्षिकेने पोलिसात केली होती. शिवाय या प्रकरणात भेंडे याची पत्नी यामिनी, साळा अशोक नाचणकर व साडभाऊ राजू पेठकर दोन्ही रा. नागपूर यांच्यावर भादंविच्या २९४ व ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करून सहआरोपी करण्यात आले होते. यामुळे सेवाग्राम पोलीस त्यांना अटक करण्याच्या तयारीत असल्याने त्यांनी न्यायालयातून अटकपूर्व अंतरीम जामीन मंजूर केल्याची माहिती आहे. तर न्यायालयीन कोठडीत असलेल्या मिलिंद भेंडची प्रकृती खालावल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून जामिनाकरिता न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्राने ‘लोकमत’ला दिली.या प्रकरणात खंडणी मागितल्याप्रकरणी सदर शिक्षिकेवर भेंडेच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात भादंविच्या कलम ५००, ५०९, ३८४ व ४५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिलाही न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
पत्नीसह साळा व साडभावाला अटकपूर्व जामीन
By admin | Updated: February 9, 2016 01:45 IST