शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सेलूचा आॅटोचालक सतीश खरा स्वच्छतादूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:14 IST

समाजसेवेचे सोंग करणारे अनेक आहेत. अशा सोंगाड्यांच्या सोंगात मात्र खºया कार्यकर्त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जाते. सेलू येथील एक आॅटोचालक असेच कार्य करून खरा स्वच्छतादूत ठरला आहे.

ठळक मुद्देगाडगेबाबा व तुकडोजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा : स्वत:च करतो शौचालयाची स्वच्छता

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : समाजसेवेचे सोंग करणारे अनेक आहेत. अशा सोंगाड्यांच्या सोंगात मात्र खºया कार्यकर्त्यांचे कार्य दुर्लक्षित केले जाते. सेलू येथील एक आॅटोचालक असेच कार्य करून खरा स्वच्छतादूत ठरला आहे. वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराला आपल्या कृतीत उतरवून स्वकृतीतून नागरिकांना स्वच्छतेचे धडे देत आहे. नगरपंचायतीने वडगाव मार्गावर नालीवर उभारलेल्या स्वच्छतागृहाच्या टाकीत लोकवर्गणीतून घेतलेल्या पाईपने पाणी भरणे व स्वच्छतागृहाची नियमित साफसफाई करण्याचे काम तो निस्वार्थपणे करतो. या अवलियाचे नाव सतीश बबनराव तडस असे आहे.सतीश व्यवसायाने आॅटोचालक आहे. दिवसभराच्या कष्टातून वाचलेल्या पैशावर तो कुटुंबाचा गाढा हाकतो. वडगाव मार्गावर बसस्थानकाच्या मागे नालीवर महिला व पुरूषांच्या सोयीसाठी नगरपंचायतीने स्वच्छतागृह सुरू केले. प्रचंड गर्दीमुळे स्वच्छतागृह घाण झाले. नाकाला सहन होणार नाही इतकी दुर्गंधी सुटली. आॅटो घेवून जाताना हे चित्र सतीशच्या नजरेत पडले. त्याच्या हृदयात संतमहात्म्याच्या निस्सीम समाजसेवेच्या व स्वच्छतेचा असलेला विचार अलगदपणे कृतीत उतरला. त्याने त्याच क्षणी निश्चिय करून त्याच्या डोक्यातील कल्पना मित्र गणेश खोडके यांना सांगितली. गणेश यांनी पुढाकार घेत लोकवर्गणी करून त्याला टाकीत पाणी भरण्यासाठी रबरी पाईप घेवून दिला. त्या दिवसापासून सतीश नियमित स्वच्छतागृहाची साफसफाई करतो व टाकीत पाणी भरतो.आपल्या कृतीतून गाडगेबाबांच्या व तुकडोजी महाराजांच्या समाज कार्याला जिवंत ठेवण्याचे काम करणारा २८ वर्षीय सतीश सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. खोट्या प्रसिद्धीच्या नादात लागणाºया ढोंगी समाजसेवकांनी सतीशचा आदर्श घेण्याची गरज निर्माण झाली आहे.ही घाण नियमित साफ करणाºया सतीशला कधी या कामाची किळस वाटली नाही. थोर संत महात्म्यांच्या कार्याचे अनुकरण आपण करतो आहे याचा आनंदच मला दिवसभर आॅटो चालविण्याची उर्जा देते, असे भोळे उत्तर तो देतो. सतीशला कधी या कामाचा मोठेपणा वाटला नाही. प्रसिद्धीची तर त्याला गरजच नाही. सहज रस्त्याने जाताना त्याचे हे काम बघून सर्व थक्क होतात. त्याचे खरे कार्य पाहून समाजसेवेचे ढोंग करून समाजात खोटी प्रतिष्ठा निर्माण करणाºयांचे बुरखे आपोआप गळून पडतात.