शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बनावट आदेशावर सागाची कटाई

By admin | Updated: May 31, 2015 01:42 IST

बनावट सर्व्हे व कटाई आदेश तयार करून शेतकऱ्याला अंधारात ठेवत त्याच्या शेतातील सागवृक्षाची कटाई केल्याचा प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघड झाला आहे.

शेतकऱ्याची फसवणूक : मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यताआकोली : बनावट सर्व्हे व कटाई आदेश तयार करून शेतकऱ्याला अंधारात ठेवत त्याच्या शेतातील सागवृक्षाची कटाई केल्याचा प्रकार वनविभागाच्या कारवाईत उघड झाला आहे. तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्याकरिता असलेला वाहतूक परवानाही बनावट असल्याचे समोर आल्याने वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी कारवाई करीत सागवान जप्त केले. या प्रकरणी वनरिक्षेत्र अधिकारी देवराव टाले यांनी शनिवारी सायंकाळी खरांगणा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून शेख हाफिज शेख नबी रा. मासोद, धनराज चंपत औजेकर रा. पिंपपळखुटा व विरेंद वेलजीभाई सुरानी रा. लकडगंज, नागपूर या तिघांवर भादंविच्या ४२०, ४६५, ४६८, ४७१ व ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जंगलव्याप्त भागात खसरा या गोंडस नावाखाली ठेकेदार व त्यांच्या दलालांनी धुडगुस घातला आहे. सुसुंद शिवारात रामा तानबा नेहारे यांच्या मालकीच्या शेतात जंगलाला लागून धुऱ्याने डेरेदार सागवृक्ष होते. त्यावर दलालांची वक्रदृष्टी पडली. मासोद येथील एका दलालाने रामा नेहारे या शेतकऱ्याच्या शेताचा सातबारा अधिकार अभिलेख पंजी, नकाशा मिळवला व त्या आधारे खोटी मंजुरी मिळवली. शेत जंगलालगत असल्यामुळे सागवृक्षाच्या कटाईच्या मंजुरीपूर्वी सर्व्हे होणे गरजेचे होते. त्याकरिता खोटे शिक्के तयार करून सर्व्हे केल्याचे दाखवले. वनविभागाकडे कोणताही अर्ज नसताना वनविभागाच्या नावे खोटा आदेश तयार करून सागवृक्षाची कटाई करण्यात आली. शेतातील व सागवृक्षांची कटाई करून न थांबता जंगलातील डेरेदार सागवृक्षही कापले. शेतातील साग कापल्याची कुणकुण शेतकऱ्याला लागताच शेतकऱ्याने शेताकडे धाव घेतली असता सत्यता उघडकीस आली. त्याने लागलीच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गाठत घटनेची माहिती दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी टाले यांनी घटनास्थळ गाढून तोडलेले सागवान जप्त केले. शेतकऱ्यांच्या शेतातील सागवान कापून ते विकणारे मोठे रॅकेट असल्याची चर्चा गावात आहे. यात चार ते पाच जणांचा सहभाग असल्याची माहिती आहे. या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास इतर अनेकही बोगस प्रकरणे बाहेर येवू शकतात. या प्रकरणात पोलीस व वनविभागाचे अधिकारी काय कारवाई करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)परवान्याच्या शासकीय पद्धतीला बगलसागवृक्ष तोडण्याकरिता प्रथम तहसीलदाराचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवावे लागते. नंतर वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात प्रकरण दाखल केल्यानंतर क्षेत्र सहाय्यक पंचनामा करतो. गरज भासल्यास मोजणीचा सर्व्हे होतो. नंतरच कटाई आदेश देण्यात येतो. येथे मात्र सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले. खोटा वाहतूक परवाना तयार करूण सागाची उचल करणार असल्याच्या कुजबुजीने हा प्रकार उजेडात आला.