शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समितीची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: June 15, 2017 00:49 IST

तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर आहे.

रात्रपाळीत पहारेकरीच नाही : अनेकदा घडल्या चोरीच्या घटना लोकमत न्यूज नेटवर्क घोराड : तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार सांभाळणाऱ्या पंचायत समिती कार्यालयाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. आधीच जीर्ण इमारत, सुरक्षा भिंतीचा अभाव आणि रात्रपाळीत सुरक्षा रक्षकही नसल्याने चोरीची शक्यता वाढली आहे. परिणामी, शासकीय दस्तावेजांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. प्रशस्त अशा जागेत ही इमारत असून तीनही बाजूने सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंत नाही. या परिसरात असणाऱ्या वसाहतीचे साहित्य यापूर्वीच चोरट्यांनी लंपास केल्याचे सर्वश्रूत आहे. अनेक वेळा येथील गोदामातून साहित्याची चोरी झाल्याच्या घटना घडल्या; पण प्रशासनाला जाग आली नाही. रात्रपाळीत येथे चौकीदार नाही. या इमारतीत कार्यालयातील दस्तावेज, संगणक, आवारात दोन चार चाकी वाहने उभी असतात. यात गटविकास अधिकाऱ्यांचे वाहन व हातपंप दुरुस्त करणाऱ्या वाहनाचा समावेश आहे. प्रत्येक विभागात लागलेले कुलर बाहेर वऱ्हांड्यात असल्याने त्यांची सुरक्षा कोण करणार, हा प्रश्नच आहे. काही दिवसांपूर्वी इमारतीच्या छतावर टाकलेल्या ताडपत्र्या वादळामुळे उडाल्या. पैकी दोन ताडपत्र्या बेपत्ता झाल्यात तर वऱ्हांड्यात असणारा वॉटर कुलरही रात्रपाळीत रामभरोसे असतो. या कार्यालयातील महागड्या वस्तू व दस्तावेजांची सुरक्षा रात्रपाळीत व सुटीच्या दिवशी वाऱ्यावरच आहे. प्रशासन याकडे लक्ष देणार काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोमवारी १०.४० वाजेपर्यंत दोन विभाग कुलूपबंद सोमवारी कार्यालयीन वेळेत अधिकारी पोहोचले असताना १०.४० पर्यंत कृषी व पंचायत विभागाचे कुलूप उघडण्याचे काम ज्यांच्याकडे होते, ते आलेच नाही. अखेर कक्ष अधिकाऱ्यांनी त्या कुलूपाच्या चाव्या दिल्या. ९.३० वाजता कार्यालयाचे कुलूप उघडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येते. ८ जून रोजी रात्रपाळीत लेखा विभागाचे कार्यालय उघडेच असल्याचे आढळून आले. हे प्रकारही नित्याचे झाले आहेत. बंद सभागृहातील लाईट, पंखे सुरूच शुक्रवारी सायंकाळी बंद करण्यात आलेले सभागृह सोमवारी १०.४५ ला उघडले असता पंखे व लाईट सुरू होते. यामुळे विजेची बचत होण्याऐवजी अपव्यय होतो. सभागृह बंद करताना पंखे व लाईट बंद करण्यात आले नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारांकडेही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे. पंचायत समितीमध्ये तीन परिचर असून नऊ विभाग आहेत. प्रत्येकी तीन विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सोमवारी ज्या दोन विभागांचे १०.४० वाजेपर्यंत कुलूप उघडले नाही, त्या विभागाची जबाबदारी असणारे परिचर रजेवर आहेत. - डी.ए. उईके, कक्ष अधिकारी, पं.स. सेलू, शनिवार व रविवारी सुट्टी होती. दरम्यान, आलेल्या वादळामुळे ताडपत्र्या उडाल्यात. त्यापैकी दोन ताडपत्र्या गायब झाल्या आहेत. रात्रपाळीत येथे कुणीही चौकीदार नाही. चौकीदाराच्या नेमणुकीची मागणी करण्यात आली आहे. - आर.व्ही. कोपरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, पं.स. सेलू.