शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित मातृत्व ही समाजाची जबाबदारी

By admin | Updated: July 18, 2015 01:57 IST

आज गर्भवती मातांची काळजी घेणाऱ्या अद्यावत चाचण्या, पूर्वतपासण्या आणि सहजपणे होईल अशी वेदनारहित प्रसूतीची साधने उपलब्ध आहेत.

सिंधू भुते : आशा सेविका मेळाव्याला मार्गदर्शन वर्धा : आज गर्भवती मातांची काळजी घेणाऱ्या अद्यावत चाचण्या, पूर्वतपासण्या आणि सहजपणे होईल अशी वेदनारहित प्रसूतीची साधने उपलब्ध आहेत. याला मानवी सहकार्याची जोड देण्याची नितांत गरज आहे. सुरक्षित मातृत्वाची जबाबदारी ही केवळ त्या स्त्रीची, तिच्या नवऱ्याची किंवा कुटुंबाची नसून संपूर्ण समाजाची आहे. याचे भान प्रत्येक नागरिकाने ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सिंधू भुते यांनी केले.सावंगी (मेघे) येथे आशा वकर्स मेळाव्यात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या हिप्पोक्रेट्स सभागृहात गर्भवती माता तसेच आशा स्वयंसेविकांकरिता मार्गदर्शनपर मेळावा पार पडला.या कार्यक्रमाला नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. दीप्ती श्रीवास्तव, शल्यक्रिया विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी येवला-पाटे, बालरोग तज्ज्ञ डॉ. पुरंदरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सी. हरिहरण, डॉ. सौनेत्रा इनामदार, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, परिचारिका विद्यालयाच्या प्राचार्य बेबी गोयल, प्रशासकीय अधिकारी शर्मिला परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. इनामदार यांनी गर्भवती व बाळंत मातेची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. तर डॉ. येवला यांनी स्त्रियांना होणारे कर्करोग, मॅमोग्राफी आणि पॅपस्मीअर तपासणी यावर प्रात्यक्षिकातून आशा सेविकांना माहिती दिली. डॉ. मोनिका पोचमपल्लीवार यांनी वेदनारहित प्रसूती याबाबत आशांना पॉवर पॉर्इंट प्रेझेंटेशनद्वारे मार्गदर्शन केले. यानंतर डॉ. दीप्ती श्रीवास्तव यांनीही आशा सेविकांसोबत संवाद साधला. कार्यक्रमाचे संचालन नंदा गाडगे यांनी केले तर आभार विनया भरणे यांनी मानले. मेळाव्याला एन.पी. शिंगणे, अजय ठाकरे, सुलोचना मोहोड, छाया धोंगडे, छाया बोबडे, इंदू आलवटकर, दीपमाला मेंढे, शालिनी मून, हेमंत पुंडकर यासह आदींनी सहकार्य केले. यावेळी आशा सेविका तसेच परिचारिका उपस्थित होत्या.(स्थानिक प्रतिनिधी)