शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

झुडपांच्या विळख्यातील ग्रामीण रस्ते धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 00:03 IST

ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते; पण त्या रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. परिणामी, सदर रस्ते झुडपांच्या विळख्यात सापडून अपघाताचे कारण ठरतात.

ठळक मुद्देअपघातांत वाढ : झुडपे कापणे तथा रस्ता दुरूस्तीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागाचा विकास व्हावा, त्यांची शहरांशी नाळ जुळली जावी म्हणून अनेक योजनांतून रस्त्यांची निर्मिती करण्यात येते; पण त्या रस्त्यांची देखभाल, दुरूस्ती व्यवस्थित केली जात नाही. परिणामी, सदर रस्ते झुडपांच्या विळख्यात सापडून अपघाताचे कारण ठरतात. सध्या जिल्ह्यात अनेक रस्त्यांना असे बकाल स्वरूप आल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात ग्रामीण भाग जोडण्यासाठी अनेक रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे; पण त्या रस्त्यांच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. देवळी तालुक्यातील कोळोणा, दहेगाव (धांदे) यासह अन्य गावांतील रस्त्यांना सध्या झुडपांचा विळखा पडल्याचे दिसून येत आहे. परिणामी, समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने अपघात होतात. हा प्रकार वाढीस लागल्याने ग्रामीण नागरिक त्रस्त आहेत. याकडे लक्ष देत झुडपे कापणे गरजेचे झाले आहे.झाडांच्या फांद्यामुळे अपघातांना निमंत्रणकोळोणा(चोरे)- वाटखेडा ते कोळोणा (चोरे) मार्गावर दोन्ही बाजुला देवबाभुळीची झाडे आहे. त्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर झुकल्या असून अपघाताला निमंत्रण देत आहे. त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे. कोळोणा ते वाटखेडा हा मार्ग अंदोरी मार्गाला जोडल्या गेला आहे. या मार्गावर वाहतुकीचे प्रमाण अती आहे. यवतमाळ जिल्ह्यात जाण्याकरिता या मार्गाचा वापर प्रवासी करतात. त्या प्रवाशांना झाडांच्या फांद्यांचा आता त्रास होतो. याच मार्गाची काही ठिकाणावर दुरवस्था झाली आहे. खड्डे व फांद्यामुळे अपघात वाढीस लागले आहे. दोन वाहने समोरासमोर आल्यास मोठी अडचण निर्माण होते. या वाढलेल्या फांद्यांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष पुरवून रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे तातडीने तोडण्यात यावी अशी मागणी आहे.