शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सिंदी प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा

By admin | Updated: September 1, 2014 00:09 IST

सिंदी (रेल्वे) येथे झालेल्या बलात्काराच्या आरोपींना त्वरित अटक करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़ याबाबत उपविभागीय

हिंगणघाट : सिंदी (रेल्वे) येथे झालेल्या बलात्काराच्या आरोपींना त्वरित अटक करून सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे़ याबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले आहे़ सिंदी (रेल्वे) येथील प्रकरणाला १० दिवसांचा कालावधी लोटला असताना अद्याप एकही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नाही़ हे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घेत चौकशी करणे गरजेचे आहे़ पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घ्यावे आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे, अशी मागणीही नागरिकांनी निवेदनातून केली आहे़ बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे़ बलात्कार करणाऱ्याचे प्राबल्य वाढत आहे. यावर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करीत आरोपींना त्वरित अटक करावी. त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात हजर करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे़ अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी निवेदनातून दिला आहे़ निवेदनाच्या प्रती गृहमंत्री, पालकमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्या आहेत़ यावेळी सागर ग्रामीण युवा मंचाचे डॉ. विजय पर्बत, सचिन मोरे, गोपाल जोडांगडे, स्रेहल चिडे, शंकर मोरे, विक्की कापटे, धिरज पाराशर, पप्पू डफ, अशोक मोरे, तुषार हवाईकर, संदेश डेकाटे, उमेश कावळे, रूपेश लाजूरकर व नागरिक उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)