शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीविरोधात रायुकाँचा रस्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:13 IST

पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

ठळक मुद्देसमीर देशमुखसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अटक व सुटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पेट्रोल व डिझेलमध्ये सातत्याने होणारी दरवाढ व पर्यायाने वाढणारी महागाई, शेतकऱ्यांच्या समस्या जैसे थे असल्याने या विरूद्ध राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुलगाव बायपासवर बुधवारी प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात रस्तारोको आंदोलन करण्यात आला. सुमारे ४५ मिनीट चाललेल्या या रस्तारोकोमुळे बायपासवर ट्रकच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत रस्ता मोकळा केला. यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.पेट्रोल व डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहे; पण सरकार यावर ठोस निर्णय घेताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर पडल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढलेले आहे. असे असताना केंद्र व राज्य शासन सामान्यांना दिलासा मिळेल, असे पाऊल उचलताना दिसत नाही, असे समीर देशमुख यांनी सांगितले. वर्धा, सेलू, आर्वी, देवळी येथे याच मुद्यावर रायुकाँने आंदोलन केले. यात जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली. हे जनतेचे सरकार, असे मोदी सरकार म्हणते तर जनता बेहाल का, याचे उत्तर आम्हाला हवे आहे. मागील महिन्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने देवळी-पुलगाव क्षेत्रातील शेतकरी समस्यांवर देवळी तहसील कार्यालयासमोर आंदोलन केले. कपाशीवर आलेली बोंडअळी व अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाले. याची शासनाने अद्याप नुकसान भरपाई दिली नाही. तुरीची आॅनलाईन खरेदी व नोंदणी बंद झाल्याने शेतकºयांचे पिकांच्या दरामध्ये भाव कोसळले असल्याचेही त्यांनी सांगितले.पुलगाव पोलिसांनी समीर देशमुख, जिल्हाध्यक्ष संदीप किटे, जि.प. सदस्य संजय कामनापुरे, श्यामसुंदर देशमुख, अजित ठाकरे, राहुल घोडे, अजित ठाकरे, संजय बोबडे, डॉ. विजय राऊत, डॉ. प्रकाश काकडे, किशोर डांगे, सुभाष ढोले, महादेव भोयर, विजय भटकर, किरण टाके, प्रवीण ढांगे, गजानन भानखेडे, दत्तात्रय धांडे, विजय धोपटे, भालचंद्र पेटकर, संजय चौधरी, संजय सारासर यासह रायुकाँ कार्यकर्त्यांना ताब्यात घेत सोडून देण्यात आले. आंदोलनात कार्यकर्ते, शेतकरी व नागरिकांनीही सहभाग घेतला होता.