शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आरटीपीसीआर कोविड चाचणी ‘लॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 05:00 IST

मागील २८ दिवसांपासून जिल्ह्यात आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्याचे काम बंद आहे. इतकेच नव्हे तर, केवळ अँटिजन किट द्वारे कोविड चाचणी केली जात आहे. विशेष म्हणजे तापाच्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल, शासकीय तसेच सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालय फुल्ल आहेत. अशातच आरटीपीसीआर कोविड टेस्ट लॉक करण्यात आल्याने आरोग्य विभागासह प्रशासन लपवाछपवी तर करीत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून चर्चिला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : आरटीपीसीआर पद्धतीची चाचणी ही नवीन कोविड बाधित शोधण्यासाठी गोल्ड स्टॅण्डर्ड मानली जाते. परंतु, मागील २८ दिवसांपासून जिल्ह्यात आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्याचे काम बंद आहे. इतकेच नव्हे तर, केवळ अँटिजन किट द्वारे कोविड चाचणी केली जात आहे. विशेष म्हणजे तापाच्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटल, शासकीय तसेच सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालय फुल्ल आहेत. अशातच आरटीपीसीआर कोविड टेस्ट लॉक करण्यात आल्याने आरोग्य विभागासह प्रशासन लपवाछपवी तर करीत नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून चर्चिला जात आहे.६०० हून अधिक मनुष्यबळ केले कमी- कोविड संकट उच्चांकी गाठत असताना जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत ६०० हून अधिक मनुष्यबळाची भरती करण्यात आली. परंतु, सध्या नवीन कोविड बाधित सापडण्याची गती मंदावल्याने शासनाच्या आदेशाला केंद्रस्थानी ठेवून हे मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेतील कार्यरत मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे.

सीएसच्या लेखी सूचनेवरून मनुष्यबळाची कपात - जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांचे कारण पुढे करून जिल्हा शल्य चिकित्सक सचिन तडस यांनी लेखी सूचना निर्गमित करून कोविड काळात भरती केलेले मनुष्यबळ कमी करण्याच्या सूचना सेवाग्राम तसेच सावंगी (मेघे) येथील रुग्णालय प्रशासनाला दिल्या आहेत.

सीएसला फोन उचलण्याची ॲलर्जी- या प्रकरणी आरोग्य विभागाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्याशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. जिल्ह्यात कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाढत असताना लोकप्रतिनिधींसह नागरिकांचे फाेन न स्विकारणे यामुळे ते बहूचर्चीत ठरले. त्यानंतर खुद्द पालकमंत्र्यांनी त्यांची कानउघाडणी केली. परंतु, अद्यापही त्यांच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 

सेवाग्राम अन् सावंगीच्या रुग्णालय प्रशासनाचा नकार कायमच- आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणीसाठी नमुने घेतल्यावर त्याच्या विश्लेषणासाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालय तसेच सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या प्रयोगशाळेला परवानगी देण्यात आली. पण, या दोन्ही प्रयोगशाळेतील मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ कमी करण्यात आल्याने आरटीपीसीआर पद्धतीने कोविड चाचणी करण्यासाठी हे दोन्ही रुग्णालय प्रशासन ‘नाहीच’ असा पाढा म्हणत आहे. संभाव्य धोका लक्षात घेवून जिल्हा अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य