शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

आरटीओ करणार अ‍ॅफकॉनच्या वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 05:00 IST

विविध साहित्याची ने-आण करताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही खबरदारीचे उपाय केले जात नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत आहे. शिवाय जड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याची माहिती अ‍ॅफकॉनच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांच्याकडून शेतकऱ्यांसह नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो.

ठळक मुद्देएसडीओंना करणार अहवाल सादर : अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर होतेय कार्यवाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समृद्धी महामार्गाचे काम पूर्णत्त्वास नेणाऱ्या अ‍ॅफकॉन कंपनीच्या मनमर्जीचा नाहक त्रास रसुलाबादसह परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. जड वाहतुकीमुळे वर्धा-रसुलाबाद मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. माहिती देऊनही अ‍ॅफकॉनचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सरपंच राजेश सावरकर यांनी एसडीओंना तक्रार केली होती. त्याची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी रसुलाबाद गाठून पाहणी केली. त्यानंतर अ‍ॅफकॉन कंपनीच्या वाहनांची संपूर्ण वाहनांची तपासणी उपप्रादेशिक परिवहन विभागाने करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी दिल्या आहेत.समृद्धी महामार्गासाठी लागणारे साहित्य अवजड वाहनांमध्ये लादून त्याची वाहतूक वायफड मार्गाने केली जात आहे. विविध साहित्याची ने-आण करताना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलेही खबरदारीचे उपाय केले जात नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना चांगलाच फटका बसत आहे. शिवाय जड वाहतुकीमुळे रस्त्यावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे तयार झाले आहेत. याची माहिती अ‍ॅफकॉनच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर त्यांच्याकडून शेतकऱ्यांसह नागरिकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो. शिवाय मद्यधुंद वाहनचालक शेतकऱ्यांनाच धमकावत असल्याने याबाबची तक्रार उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.याच तक्रारीची दखल घेऊन उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तेथील विदारक परिस्थिती बघितल्यावर उपविभागीय महसूल अधिकारी बगळे यांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाला लेखी सूचना निर्गमित करून अ‍ॅफकॉनच्या संपूर्ण वाहनांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या तपासणीदरम्यान कुठलाही गैरप्रकार आढळल्यास उपप्रादेशिक परिवहन विभाग दोषींवर कठोर कारवाई करणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस