शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

परवाना काढण्यासाठी आरटीओची दादागिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:35 IST

उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देदुपारी येतात अधिकारी : चिरीमिरी न दिल्यास करतात नापास

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : उपप्रादेशिक परिवहन विभाग, वर्धा अंतर्गत परवाना काढण्यासाठी आष्टीला कॅम्प आयोजित करतात. पण, अधिकारी अवेळी उपस्थित राहतात. तसेच दलालाच्या माध्यमातून चिरीमिरी घेतल्याशिवाय कामच होत नसल्याने अधिकाऱ्यांच्या या दादागिरीमुळे वाहनधारकांना चांगालच त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत गुरुवारी राज्याच्या परिवहन आयुक्तांनाही लेखी तक्रार करण्यात आली आहे.प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दोन दिवस आधी आष्टीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने परवाना काढण्यासाठी कॅम्प आयोजित केल्या जातो. यानुसार २८ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृहात शंभरावर दुचाकीचालक व डझनभर चारचाकी चालक परीक्षा देण्यासाठी जमले होते. यावेळी परिवहन विभागाचे अधिकारी तथा कर्मचारी दुपारी २ वाजता हजर झाले. कमी वेळेत सर्वांना निकाली काढण्यासाठी घाईघाईने प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी आष्टीचे राहुल देशमुख चारचाकी गाडीच्या स्टेअरींगवर बसले. तेव्हा अधिकाºयांनी त्यांना गाडी चालू देण्याऐवजी ‘तुम्ही नापास झाले. माझ्याशी मुजोऱ्या करू नका. पुढच्या वेळी पास करुन देईल.’ अशी उत्तरे देवून वेळ मारुन नेली. येथे दुचाकीच्या परवान्यासाठी एक हजार रुपये तर चारचाकीसाठी दोन ते अडीच हजार रुपये चिरीमिरी घेतात. दिली नाही तर लिंक नसल्याचे कारण सांगून पतरवून लावत असल्याचे सांगण्यात आले....तर तुमच्यावर कारवाई करुवाहनचालकांच्या तक्रारीवरुन प्रतिनिधी तेथे गेले असता उपस्थित अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला. तसेच फोटो काढू नका, परवानगी घेतली आहे का. अन्यथा तुमच्यावर कारवाई करु अशी भाषा वापरुन दमदाटी केली. यावरुन या अधिकारी व कर्मचाऱ्यांची किती मुजोरी वाढली हे दिसते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस