शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

देवळीत ४.१६ लाखांचा जुगार

By admin | Updated: September 2, 2016 02:02 IST

पोळ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी चिकणी (जामणी) येथे धाड घालत जुगार प्रतिबधंक कायद्यान्वये कारवाई केली

न.प.उपाध्यक्ष व कृउबास संचालकांचा सहभाग देवळी : पोळ्याच्या पूर्वसंध्येला पोलिसांनी चिकणी (जामणी) येथे धाड घालत जुगार प्रतिबधंक कायद्यान्वये कारवाई केली. यात ४ लाख १६ हजारांचा मुुद्देमाल जप्त केला आहे. या जुगारात येथील पालिकेचे उपाध्यक्ष, बाजार समिती संचालक व व्यापाऱ्यांचा समावेश असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस सुत्रानुसार, चिकणी (जामणी) येथील अशोक कारोटकर यांच्या शेतातील बंड्यात जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत बाजार समितीचे संचालक मंगेश वानखेडे रा. वाटखेडा तसेच न.प. उपाध्यक्ष विजय गोमासे, व्यापारी राममनोहर टावरी, उमेश कामडी व आबीद शेख सर्व रा. देवळी यांना जुगार खेळतांना पकडण्यात आले. या आरोपींवर जुगार कायद्याच्या कलम १२ अन्वये अटकेची कारवाई करून जामिनावर सुटका करण्यात आली. या कारवाईत एक लाख तीन हजार ७०० रुपये रोख तसेच, दोन लाख आठ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी व मोबाइल असा एकूण ४ लाख १६ हजाराचा दस्तावेज जप्त करण्यात आला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक एस.के. चव्हाण यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.(प्रतिनिधी) सेलूतही जुगार अड्ड्यावर धाड सेलू - येथील पोलिसांनी पोळ्याच्या सायंकाळी एका जुगार अड्ड्यावर धाड घातली. यावेळी पोलिसांनी पकडलेल्या जुगारात तहसीलचे कर्मचारी, काही शिक्षक व शहरातील मोठे व्यापाऱ्यासह डझनभर लोक असल्याची चर्चा आहे. सदर प्रकरण दडपण्यासाठी काही बडी मंडळी ठाण्यात सेटींगच्या दृष्टीने हालचाली करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रानेच दिली. सेलू पोलीस मात्र चौकशीच्या नावावर मौनधारण केले होते.