शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भिडीत सरपंच निवडणूक प्रक्रिया वादाच्या फेऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 21:09 IST

अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये एकमेव असलेल्या काँग्रेस उमेदवाराची उपसरपंचपदी वर्णी लागली निवडणुक प्रक्रियेतील घोळ व निर्णय अधिकाºयांच्या पक्षपाती भूमिकेतून हा सर्व प्रकार घडला असल्यामुळे या ग्रा.पं.च्या उपसरपंचपदाची निवड रद्द करण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी.

ठळक मुद्देनिवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पक्षपाती भूमिका : शिवसेना उमेदवाराचे नामांकन रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये एकमेव असलेल्या काँग्रेस उमेदवाराची उपसरपंचपदी वर्णी लागली निवडणुक प्रक्रियेतील घोळ व निर्णय अधिकाºयांच्या पक्षपाती भूमिकेतून हा सर्व प्रकार घडला असल्यामुळे या ग्रा.पं.च्या उपसरपंचपदाची निवड रद्द करण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनंत देशमुख, भिडीचे सरपंच सचीन बीरे व व सेना कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना साकडे घातले. प्राप्त माहितीनुसार मंगळवारी भिडी ग्रामपंचायत कार्यालयात उपसरपंचपदाची निवडणूक आयोजीत करण्यात आली होती. नामाकंन अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी १२ वाजेपर्यंत होती. काँग्रेसचे उमेदवार अतुल खत्री यांनी नामांकन दाखल केल्यानंतर शिवसेनेचे मनोज बोबडे यांनी आपला नामांकन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी पं.स.चे विस्तार अधिकारी प्रमोद लाकडे यांचे स्वाधीन केला. यावेळेस ग्रा.पं.कार्यालयाच्या घड्याळीत ११ वाजून ५५ मिनीटाची वेळ झाली होती. परंतू माझ्या मनगटाचे घड्याळीत १२ वाजून ५ मिनीटाची वेळ झाली असल्याने निवडणूक निर्णय अधिकाºयांनी सांगुन माझे नामांकन रद्द केले. असा आरोप उमेदवार बोबडे व शिवसेना पदाधिकाºयांनी केला. अकरा सदस्यीय भिडी ग्रामपंचायतमध्ये शिवसेना ८, भाजपा २ व काँग्रेस १ असे संख्याबळ असून सरपंच पद शिवसेनेकडे आहे. या ग्रा.पं.मध्ये सेना - भाजपाकडे स्पष्ट बहुमत असतांना उपसरपंच पदासाठी काँग्रेस उमेदवाराची झालेली निवड सेना पदाधिकाºयांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. नामांकन दाखल करण्याच्या वेळेपर्यत या पदाच्या उमेदवाराबाबत घोळ असल्याने सेनेचा नामाकंन अर्ज अगदी वेळेवर पोहचला असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी, देवळीचे तहसीलदार काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे राहणार आहे.सेनेचे उपसरपंच पदाचे उमेदवार मनोज बोबडे यांचे नामाकंन १२ वाजून ५ मिनिटांनी आले. तशा प्रकारची वेळ टाकून त्यांना पावती देण्यात आली. यामध्ये कोणताही पक्षपात करण्यात आला नाही. या निवडणूक प्रक्रियेचा संपूर्ण अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला आहे.- प्रमोद लाकडे,निवडणूक निर्णय अधिकारी,भिडी.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक