शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

इमारतींचे छप्परही मद्यपींचे अड्डे

By admin | Updated: April 7, 2017 02:05 IST

दारूबंदीच्या जिल्ह्यात अमृत महोत्सव साजरा होत असताना अद्यापही दारू बंद झाल्याचे दिसत नाही. पोलीस प्रशासन

दारूबंदीचा बोजवारा : शहरातच घेतले जातात सर्वाधिक मद्याचे घोटवर्धा : दारूबंदीच्या जिल्ह्यात अमृत महोत्सव साजरा होत असताना अद्यापही दारू बंद झाल्याचे दिसत नाही. पोलीस प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असले तरी दारूविक्रेते तथा मद्यपीही जुमानत नसल्याचे दिसते. शहरातील विविध इमारतींच्या छतावर रंगणाऱ्या ओल्या पार्ट्यांतूनच हे सिद्ध होत आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीला ७५ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. या काळात पोलीस यंत्रणेने दारूबंदीवर प्रभावी अंमल करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अद्यापही जिल्ह्यातील दारू बंद होऊ शकली नाही, हे वास्तव आहे. शासकीय कार्यालये तथा सार्वजनिक इमारतींच्या छतावर रात्री सर्रास ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे दिसते. विविध इमारतींच्या छतांवर दिसणाऱ्या दारूच्या रिकाम्या बाटल्या, विविध खाद्यपदार्थांचे रिकामे पुडके, प्लास्टिकचे ग्लास यावरून ही बाब सिद्ध होत आहे. आर्वी नाका परिसरात असलेल्या काही इमारतींच्या छतावर हे प्रकार नेहमीच चालत असल्याचे तेथील एकूण स्थितीवरून दिसून येते. आर्वी नाका परिसरात काही दुकान गाळे असलेल्या इमारती आहेत. या इमारतींच्या पायऱ्या, छतांवर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच पाहावयास मिळतो. मद्यपी रात्रीच्या काळोखाचा फायदा घेत या इमारतींमध्ये मद्याचे घोट रिचवित असल्याचे पाहावयास मिळते. शिवाय अन्य बांधकाम रखडलेल्या इमारतीही मद्यपींचे अड्डे बनल्याचे दिसून येते. काही मैदानांवर पूर्वी चालणाऱ्या पार्ट्या कमी झाल्या असल्या तरी इमारतींतील प्रकार वाढले. दारूबंदीसाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस यंत्रणेने या अड्ड्यांकडेही लक्ष देत मद्यपींना दंडित करणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)उत्पादन शुल्क विभाग नावापूरताचदारू खुली असलेल्या जिल्ह्यात उत्पादन शुल्क विभागाकडून महसूल गोळा करण्याचे तथा तत्सम दुकाने, बार यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम केले जाते तर दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात अवैध दारूविक्री थांबविण्याची जबाबदारी या विभागावर असते; पण वर्धा जिल्ह्यातील उत्पादन शुल्क विभाग केवळ नावापूरताच असल्याचे दिसते. या विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या तुटवडा असून कारवाईच्या नावावर केवळ फार्स केला जात असल्याचेच दिसते. परिणामी, दारूविक्रेत्यांचे मनसुबे वाढत असून मद्यपींनाही आडकाठी होत नसल्याचे दिसते. पोलीस यंत्रणा आणि उत्पादन शुल्क विभागाने सामायिक प्रयत्न केल्यास जिल्ह्यातील दारू हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही. हे करीत असताना मद्यपींवरही कारवाई गरजेची झाली आहे. पोलिसांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी आणि इमारतींतील मद्यपींचे अड्डे बंद करावेत, अशी मागणी सामान्यांतून समोर येत आहे.