शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

‘सुपर कम्युनिकेशन वे’ बाबत भूमिका अस्पष्ट

By admin | Updated: August 17, 2016 00:52 IST

नागपूर ते मुंबई हा ७५० कि़मी. लांबीचा सुपर कम्युनिकेशन वे २२ जिल्ह्यातून जात आहे

शेतकऱ्यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू : नागपूर ते मुंबई हा ७५० कि़मी. लांबीचा सुपर कम्युनिकेशन वे २२ जिल्ह्यातून जात आहे. शिवाय २१ टाऊनशिपचा यामध्ये समावेश आहे. यात सेलू तालुक्यातील सेलडोह, येळाकेळी, पुलगावचा समावेश आहे. याकरिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र शासनाची याबाबत भूमिका स्पष्ट नसल्याने सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. याबाबत निर्णय घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. निवेदनात बाजारभावापेक्षा चारपट मोबदला मिळावा, शेतकऱ्यांच्या मुलांना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. भूमि अधिग्रहण कायद्यांसंदर्भात संपूआ आघाडीने जी भूमिका घेतली ती या सरकारने घ्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आला आहे. रायुकाँचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने सेलू तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या महामार्गाला विरोध नाही. मात्र शासनाची भूमिका संदिग्ध आहे, असे निवेदनात नमुद केले आहे. शिवाय शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी या निवेदनातून मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. याबाबत समीर देशमुख म्हणाले की, सूपर कम्युनिकेशन वे ची संकल्पना चांगली आहे. विकासाबाबत आमची भूमिका सदैव सहकार्याची आहे. मात्र हे करताना कुणावरही अन्याय होऊ नये. आज तालुक्यातील शेतकरी संभ्रमात आहे. शासनाने खुलेपणाने शेतकऱ्यांशी चर्चा करावी यासाठी हे निवेदन देण्यात येत असल्याचेही नमुद केले आहे. यावेळी तहसीलदार रवींद्र होळी यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. निवेदन देताना तालुकाध्यक्ष मिलिंद हिवलेकर, बाजार समितीचे सभापती विद्याधर वानखेडे, हरिभाऊ झाडे, मोरेश्वर नाखले, कोटंबकार, महानाम रामटेके, श्याम वानखेडे, नितीन फासगे, उल्हास रणनवरे, दिलीप ठाकरे, रामु पवार, अनिल जिकार, दिलीप गावंडे, नरेश खोबे, शुभम झाडे व शेतकरी बांधव उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)