शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शाळेतील प्रयोगशाळा ठरणार ‘रोल मॉडेल’

By admin | Updated: December 29, 2014 01:58 IST

‘वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कामाविषयी आसक्ती यामुळेच या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांची कल्पकता व शिक्षिकांच्या परिश्रमातून साकारलेली ...

पुलगाव : ‘वाळूचे कण रगडिता, तेलही गळे’ या म्हणीप्रमाणे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, कामाविषयी आसक्ती यामुळेच या प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांची कल्पकता व शिक्षिकांच्या परिश्रमातून साकारलेली ही प्राथमिक शाळा प्रयोगशाळा जिल्ह्यात ‘रोल मॉडल’ ठरणार आहे़ विद्यार्थ्यांनी मुक्तपणे प्रयोगशाळेत प्रयोग करावा़ भाषेच्या प्रयोगशाळेत स्वत: अध्ययन करावे, असे आवाहन जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथ.) रवींद्र काटोलकर यांनी केले. स्थानिक बढे प्लॉट येथील जि.प. प्राथमिक शाळेत जि.प. शिक्षणाधिकारी काटोलकर यांच्या मार्गदर्शनात शिक्षिका, विद्यार्थी व लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिल्या प्राथमिक शाळा विज्ञान व भाषा प्रयोगशाळेची निर्मिती करण्यात आली. अत्यंत टाकाऊ वस्तू की, ज्याची कवडीमोल किंमत असलेल्या वस्तूंपासून साकार केली़ ही प्रयोगशाळा भूगोल, ग्रंथालय, विज्ञान व भाषा विभागात विभागण्यात आली आहे. यात बाल कलावंतांनी शाळेच्या भितींचा उपयोग काळा रंग लावून फळ्यासारखा केला आहे. त्यावर विद्यार्थ्यांना आपल्या वैचारिक बाबीची वजा-बाकी, गुणाकार, भागाकार उपकरणाची आकृती काढण्यासाठी केला आहे. या भिंती फलकावर विविध सुभाषिते, प्रायोगिक तत्वे, विज्ञान व भूगोल विषयाची माहिती दिली आहे़ प्रयोगशाळेतील टेबलवर काही प्रायोगिक उपकरणे व प्रयोगदेखील केले आहेत. विज्ञान प्रयोगशाळेत वैज्ञानिक युगात वावरताना आवश्यक ज्ञानाची पूर्ती होते. भाषा विभागात विद्यार्थ्यांना हसत - खेळत संभाषणातून भाषेचा व बुद्धीचा विकास कसा करावा, याची माहिती मिळते. ग्रंथालय विभागातून छोटेखानी असले तरी विद्यार्थ्यांनी बुद्धीमत्ता पणास लावली आहे़ शिवाय जगातील प्राणीमात्र व शरीर विज्ञानाची माहितीही या प्रयोगशाळेतून मिळते. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सतीश आत्राम, विस्तार अधिकारी ओंकार खिरोळे, प्रकाश तेलरांधे, ग्रा.पं. सदस्य योगिनी पोहेकर, मुख्याध्यापिका वर्षा सुरपांग, केंद्र प्रमुख संगीता शेरके, सुरेखा कामटकर, प्रफूल राऊत, सुषमा रणधाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते़(तालुका प्रतिनिधी)