शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागाच्या विकासात अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 01:49 IST

ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.

ठळक मुद्देरामदास तडस : समस्या निकाली काढण्यासाठी पाठपुरावा करणार

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : ग्रामीण भागाच्या विकासासाठी अभियंत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागत आहे. अभियंत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार रामदास तडस यांनी दिले.येथील बा. दे. अभियांत्रिकी महाविद्यालयात जि.प. अभियंता संघटनेची राज्यस्तरीय विशेष बैठक रविवारी पार पडली. या कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर आ. समीर कुणावार, जि.प. अध्यक्ष नितीन मडावी, संघटनेचे राज्य अध्यक्ष राजू शिंदे, महासचिव सुहास धारासुरकर, कार्याध्यक्ष सतीश मार्बते, बा.दे. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे, संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उगेमुगे, रावसाहेब पाटील आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.खा. तडस पुढे म्हणाले, पाच वर्षांत सरकारने विकास साधला आहे. ग्रामीण भाग शहराशी जोडल्या गेला पाहिजे. शासनाचा सर्व निधी ग्रामीण भागात पोहचविणे आणि चांगल्या प्रकारे काम करण्याची जबाबदारी अभियंत्यांची असते. शिवाय, ते चांगल्या प्रकारे कार्य करतात. मागील सरकारपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार गतीने काम करीत आहे. वर्धा ही महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असल्याने या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे. तुमच्या मागण्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.पंचायत राजमध्ये अभियंत्यांना विविध प्रकारची आणि योजनेची कामे करावी लागतात. ग्रामीण भागात काम करीत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपणही प्रयत्न करू, असे जि.प. अध्यक्ष नितीन मडावी यावेळी म्हणाले. कार्यक्रमादरम्यान हिंगोली येथील प्रज्ञा कुळकर्णी लिखित ‘शब्द राणी’या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक संजय उगेमुगे तर संचालन अविनाश गोहाड यांनी केले. बैठकीला २८ जिल्ह्यातील १५० पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.मुंबई दरबारी प्रश्न मांडणार -समीर कुणावारसंघटनेच्या माध्यमातून प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्या जातात. अभियंता हा विकासातील महत्त्वाचा घटक आहे. आम्ही निधी आणतो. शासन उपलब्ध करून देते; पण प्रत्यक्षात कामाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम अभियंता करीत असतात. म्हणून लोकविकाच्या कामात आणि सेवा देण्यात अभियंता महत्त्वाचा आहे. त्यांच्या समस्या निकाली निघाव्या म्हणून आपण हा विषय येत्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळात मांडू, असे आश्वासन आ. समीर कुणावार यांनी याप्रसंगी दिले.

टॅग्स :Ramdas Tadasरामदास तडस