शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोहण्याचा कापूस चालला आर्वीत

By admin | Updated: November 28, 2015 03:08 IST

कापसाला आधीच शासनाने न परवडणारा भाव दिला आहे. असे असतानाही रोहणा येथे खासगी व्यापाऱ्यांकडून आर्वीच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये कमी भाव मिळत आहे.

भावात तफावत : संकलन केंद्रावर आवक मंदावलीरोहणा : कापसाला आधीच शासनाने न परवडणारा भाव दिला आहे. असे असतानाही रोहणा येथे खासगी व्यापाऱ्यांकडून आर्वीच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे रोहणा परिसरातील कापूस आर्वी बाजारात विक्रीस जात आहे. परिणामी रोहणा संकलन केंद्रावर कापसाची आवक मंदावली आहे.रोहणा येथे अद्यावत यंत्र सामुग्री असलेला, पाण्याची व विजेची पर्याप्त व्यवस्था असलेला जीन आहे. कापसाची साठवणूक करण्यासाठी भरपूर सिमेंट ओटे तथा भव्य परिसर आहे. दरवर्षी या जीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस गोळा होतो. यंदा रोहणा येथील खासगी व्यापारी कापूस खरेदी करताना आर्वी येथील भावाच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये प्रतिक्विंटल दर कमी देत आहे. शेतकऱ्याने किंवा खेडा व्यापाऱ्याने आपला कापूस आर्वी बाजारात नेल्यास त्याला प्रतिक्विंटल पन्नास ते शंभर रूपये वाहतूक खर्च जास्त लागतो. म्हणून आमचा भाव आर्वी पेक्षा कमी असतो असे रोहणा येथील व्यापारी सांगतात. वास्तविक पाहता रोहणा येथील जीनमध्ये जिनिंग व प्रेसिंगची व्यवस्था आहे. गाठी ठेवण्यासाठी एनसीडीसीचे मोठे गोदामही आहे. व्यापाऱ्यांच्या गाठी मोठे व्यापारी जागेवरून उचलतात. रोहणा परिसरात काळी कसदार जमीन असून या परिसरातील कापूस उत्तम प्रतीचा व लांब धाग्याचा असतो. कापसाच्या पाकळीत कमी सरकी व अधिक रूईसाठी प्रसिद्ध असलेल्या विविध वाणांचा येथे अधिक पेरा असतो. तसेच बंडीने कापूस बाजारात नेण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे. सधन शेतकरी व खेडा व्यापारी कापूस वाहतुकीसाठी मालवाहक गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशावेळी आर्वी बाजारात कापूस नेण्यासाठी खूप मोठा वाहतूक खर्च येत नाही. परिणामी जास्त दर मिळत असल्याने रोहणा परिसरातील कापूस आर्वी येथे विक्रीस जात आहे. ही वाहतूक टाळण्यासाठी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांना आर्वीचाच भाव मिळावा अशी स्थानिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे. भावातील ही तफावत यापुढेही अशीच सुरू राहिल्यास रोहणा परिसरातील उच्च प्रतीचा हजारो क्विंटल कापूस आर्वी बाजारात जाईल व स्थानिक जीनमध्ये अत्यल्प आवक होईल. त्यामुळे रोहणा येथील जीन प्रशासनाने खासगी व्यापाऱ्यांना आर्वीच्या भावातच रोहणा येथे कापूस खरेदीच्या सूचना कराव्या अशी मागणी रोहणा परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)