शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मौल्यवान साहित्य पळविणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 21:52 IST

गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे२.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गर्दीचा फायदा घेत नागरिकांजवळील मौल्यवान साहित्यासह रोख लंपास करणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या टोळीत एकूण पाच सदस्य असून त्यात चार महिलांचा समावेश आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी सुमारे २.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सरीता मधु उपाध्ये (२०), मनिषा आतीश शेंडे (२४), रंजीता सनी उर्फ विशाल पाथरे (४२), लक्ष्मी अजीत बोडखे, (२६) व शेख फिरोज शेख बशीर (३६) सर्व रा. चितोडा, असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.चार महिला हिंगणघाट येथून आॅटोत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरुन समुद्रपूर मार्ग वर्धाकडे येत असल्याची माहिती वर्धा शहर पोलिसांना मिळाली. त्या आधारे शहर ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी गांधी चौकात नाकेबंदी करून काही वाहनांची पाहणी केली. दरम्यान एका वाहनात काही महिला आढळून आल्या. त्यांना पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी आपला तोरा दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे दोन मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेला आॅटो असा एकूण २ लाख १३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्यांनी पोलिसांना हिंगणघाट व वर्धा येथील एकूण दोन गुन्ह्याची कबुली दिली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे, ठाणेदार मदने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार दत्तात्रय ठोंबरे, सचिन इंगोले, सचिन धुर्वे, दिनेश तुमाने, संजय पटले, विशाल बंगाले, दिनेश राठोड, अमरदीप पाटील यांनी केली.