शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याच्या दुतर्फा अवजड वाहनांच्या रांगा

By admin | Updated: September 11, 2016 00:41 IST

शहरातील आरती चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे अवजड वाहनांच्या दुरूस्तीची काही दुकाने आहेत.

अपघाताचा धोका : वाहन दुरूस्तीच्या दुकानांसमोरच होते गर्दीवर्धा : शहरातील आरती चौक परिसरात असलेल्या पेट्रोल पंपाच्या मागे अवजड वाहनांच्या दुरूस्तीची काही दुकाने आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या या दुकानांच्या समोर ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर यासह अन्य मालवाहू वाहने उभी असतात. या वाहनांमुळे रस्ता संकुचित होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दुकाने हटवून कारागिरांना बेरोजगार करू नये; पण किमान रस्त्याच्या कडेला वाहने उभी करण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी सामान्यांतून होत आहे. शहरातील ‘सिव्हील लाईन एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आरती चौक ते विश्राम गृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सारखी वर्दळ असते. शिवाय पोस्ट आॅफीस चौक ते आरती चौक या मार्गाने बसेसची रहदारी सुरू असते. यातील नगर परिषद चौकामध्ये रस्त्याच्या कडेला काही वाहने दुरूस्ती करणाऱ्याची दुकाने आहेत. नगर परिषदेच्या जागेवर असलेली ही दुकाने वाहतुकीला अडथळा ठरत नसली तरी त्यांच्या दुकानांसमोर वा दुरूस्तीसाठी उभी राहणारी अवजड वाहने मात्र अपघातास कारणीभूत ठरत आहेत. पेट्रोल पंपाच्या मागील भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूला शनिवारी ट्रक उभे होते. यामुळे समोरून येणारी वाहने दृष्टीस पडत नाही. शिवाय चौकामध्येही काही वाहने उभी करण्यात आली होती. या प्रकारामुळे अपघाताचा धोका बळावला होता. नगर परिषद कार्यालय असलेल्या या चोकात यापूर्वीही बरेच अपघात झाले आहे. अपघाताचा धोका ओळखून मार्गावर गतिरोधक निर्माण करण्यात आले; पण यामुळे केवळ वाहनांची गती कमी झाली. आजही अपघात होतातच. वाहन दुरूस्तीची दुकाने रस्त्याच्या कडेला असल्याने नादुरूस्त वाहने रस्त्याच्या कडेला दुकानांसमोर वा परिसरात उभी केली जातात. दुरूस्तीला विलंब झाल्यास ही वाहने दोन-दोन दिवस तेथेच उभी असतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत किमान रस्त्यावरील अवजड वाहनांवर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)विद्यार्थ्यांची असते वर्दळआरती चौक ते विश्रामगृह याच मार्गावर यशवंत महाविद्यालय, सामाजिक न्याय भवन, सेवाग्राम रोड तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आहे. यामुळे या मार्गावर नागरिक, विद्यार्थ्यांची सतत ये-जा असते. सकाळपासून विद्यार्थ्यांचीच अधिक गर्दी असते. याच मार्गावर रस्त्याच्या कडेला अवजड वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका बळावला आहे. शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळेही दुचाकी वाहनांना अधिक धोका असतो. आरती चौकातील पेट्रोल पंपाच्या मागे काही ट्रक, ट्रॅक्टर, ट्रेलर व अन्य जड वाहनांच्या दुरूस्तीची दुकाने आहेत. ही दुकाने रस्त्यावर नसली, त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नसला तरी त्यांच्या दुकानांसमोर होणारी वाहनांची गर्दी अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या दुकानदारांवर कारवाई करून त्यांना बेरोजगार करणे, हा कुणाचाही हेतू नाही; पण किमान सदर दुकानदारांनी वाहने अन्यत्र उभी करण्याच्या सूचना कराव्या, अशी अपेक्षाही सामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.