शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
3
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
4
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
5
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
6
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
7
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
8
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
9
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
10
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
11
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
12
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
13
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
14
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
15
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
16
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
17
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
18
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
19
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
20
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
Daily Top 2Weekly Top 5

५८ लाखातून तीन तालुक्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 22:10 IST

आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.

ऑनलाईन लोकमतआर्वी : आर्वी, कारंजा व आष्टी या तीन तालुक्यातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी ५८ कोटींचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करून दिला आहे. त्यासाठी माजी आमदार दादाराव केचे व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता.आर्वी तालुक्यातील रोहणा-दिघी-सायखेडा रस्त्याकरिता १९० लाख रुपये, पिंपळखुटा-दाणापूर-ब्राह्मणवाडा-खैरवाडा पुलाच्या बांधकामासह रस्त्यासाठी २०० लाख रुपये, सावळापूर-लहादेवी-पांजरा- दहेगावकरीता १८० लाख रुपये, काचनुर-तळेगाव-पानवाडी रस्त्यासाठी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.आष्टी तालुक्यातील खडकी-खंबित-बेलोरा रस्त्याकरीता ५४३ लाख रुपये, वडाळा-साहूर- माणिकवाडा- सुसुंद्रा रस्त्यासाठी ५१८ लाख रुपये, नांदपूर-चिस्तुर-खडकी रस्त्यासाठी ३४७ लाख रुपये, पोरगव्हाण - पंचाळा रस्त्यासाठी २१० लाख रुपये, खडकी-खंबीत-बेलोरा रस्त्यावरील पुलाच्या बांधकामासाठी १५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.कारंजा तालुक्यातील हिंगणी-बोरधरण-गरमसुर-मेटहिरजी-धानोली-राहाटी-सावली रस्त्यासाठी ५९५ लाख रुपये, पिंपळखुटा- दाणापूर-खैरवाडा -ब्राह्मणवाडा रस्त्यासाठी ४१५ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर मार्गासाठी ४०२ लाख रुपये, पार्डी- सारवाडी-सावळी-चिंचोली-सेलगाव (उ)-उमरी-धावसा-कन्नमवारग्राम या मार्गासाठी ३९६ लाख रुपये, सुकळीबाई-बांगडापूर रस्त्यासाठी ३२५ लाख रुपये, वडाळा-साहूर-माणिकवाडा-सुसुंद्रा-काकडा-परसोडी -सेलगाव-ठाणेगाव रस्त्यासाठी ३२४ लाख रुपये, तसेच याच रस्त्यावरील अंतर २१ ते ३३ कि.मी. करीता २८४ लाख रुपये, कारंजा-मोर्शी- खरसखांडा मार्गासाठी २३६ लाख रुपये, काटोल-धर्ती-बोरी-ठाणेगाव या रस्त्याच्या बांधकामासाठी १७० लाख रुपये, ठाणेगाव-खरसखांडा- सावळी मार्गासाठी १०५ लाख रुपये, कारंजा (घा.)मधील बायपास करीता ७६ लाख रुपये, ढगा-ब्राह्मणवाडा या रस्त्याच्या दुरूस्तीकरिता ७६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.रस्त्यांची झाली होती चाळणीआर्वी, आष्टी व कारंजा (घा.) तालुक्यातील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळणी झाली होती. सदर मार्गांवरून ये-जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांची समस्या लक्षात घेता माजी आमदार दादाराव केचे व सुमीत वानखेडे यांनी संबंधितांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्थसंकल्पात निधीची तरतुद करण्यात आली.