शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

गावकऱ्यांचा रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 23:53 IST

तालुक्यातील भिडी येथे मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार माजी सरपंच गंभीर जखमी झाले. दिलीप बिल्डकॉनच्या चुकीमुळे महिन्याभरात दोन अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपार ११ वाजता रास्तारोको केला.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धा- यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

ठळक मुद्देदोन तास वाहतूक ठप्प : दिलीप बिल्डकॉन कंपनीविरूद्ध गावकऱ्यांचा आक्रोश

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यातील भिडी येथे मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार माजी सरपंच गंभीर जखमी झाले. दिलीप बिल्डकॉनच्या चुकीमुळे महिन्याभरात दोन अपघात झाल्याने संतप्त नागरिकांनी गुरुवारी दुपार ११ वाजता रास्तारोको केला.तब्बल दोन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वर्धा- यवतमाळ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.प्रदीप डहाके, असे जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. ते दुचाकीने जात असताना एम.एच. ३२ झेड ०३४६ क्रमांकाच्या मालवाहू वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. वर्धा-यवतमाळ मार्गावर दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या नियोजनशुन्यतेमुळेच अपघात होत असल्याचा आरोप करीत गावकऱ्यांनी रास्तारोको केला. अखेर पोलिसांच्या मध्यस्तीनंतर गावकरी आणि बिल्डकॉनचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली. यावेळी रस्ता ओलांडण्याकरिता ओव्हरब्रीज तयार करावा, गावात जाण्याकरिता सर्व्हीस रोड तातडीने तयार करावा तसेच बसस्थानक दुसरीकडे हलविण्यात यावे आदी मागण्या लावून धरल्या. या आंदोलनातील मयूर डफरे, सुनील चोरे, डॉ. प्रकाश काळे, वासुदेव दिघाडे, सचिन गवळी, सुशील राऊत व पदाधिकाºयांनी प्रश्नांचा भडीमार केला. मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.चौपदरीकरणाचा फटकानागपूर-तुळजापूर महामार्गाचे सिमेंंटिकरण व चौपदरीकरीणाचे काम सुरू आहे.हे काम दिलीप बिल्डकॉन कंपनीमार्फत होत असल्याने ठिकठिकाणी नियोजनशून्यतेमुळे वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. देवळी-यवतमाळ मार्गावरील भिडी या गावातही या महामार्गाचे काम सुरु आहे. येथील बांधकामातही कंत्राटदार असलेल्या बिल्डकॉन कंपनीने मनमर्जी काम चालविले आहे. याचा त्रास गावकºयांसह विद्यार्थी व शेतकºयांना सहन करावा लागत असल्याने रोष वाढत आहे.

टॅग्स :Strikeसंप