शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एसी वाहनातूनच रस्त्याची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 23:29 IST

धुनिवाले चौक ते धंतोली चौक बॅचलर रोडच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरण व सौदर्यींकरण कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिला.

ठळक मुद्देबांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्याचा प्रताप : आजी, माजी आमदारांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : धुनिवाले चौक ते धंतोली चौक बॅचलर रोडच्या चौपदरीकरणासह सिमेंटीकरण व सौदर्यींकरण कामात गैरप्रकार होत असल्याचा आरोप करीत नागरिकांसह स्वत: आंदोलन करू, असा इशारा आ.डॉ. पंकज भोयर यांनी दिला. यानंतर गुरूवारी बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास डेबळवार यांनी वर्धा गाठत बॅचलर रोडच्या कामाच्या पाहणीचा ‘फार्स’ केला. सदर अधिकाऱ्यांच्या चमूने एसी कारमध्ये बसूनच बॅचलर रोडच्या कामाची गुणवत्ता तपासली, हे विशेष!नागपूर येथून वर्धेत दुपारी २ वाजता दाखल झालेल्या अधिकाऱ्यांच्या चमूने धुनिवाले चौक येथून बॅचलर रोड मार्गे पावडे नर्सिंग होम चौक गाठला. यानंतर हा ताफा यू-टर्न घेत पुन्हा आर्वी नाका, धुनिवाले चौकाच्या दिशेने निघाला; पण मधेच हा ताफा न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजसमोर थांबला. येथून यू-टर्न घेत दुपारी २.३० वाजता माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे यांच्या मुलाच्या दवाखान्यासमोर थांबला. येथे सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूरचे मुख्य अभियंता उल्हास डेबळवार यांच्याशी आ.डॉ. पंकज भोयर, माजी आमदार विश्वनाथ डायगव्हाणे तसेच परिसरातील काही नागरिकांनी चर्चा केली. याप्रसंगी माजी आमदार डायगव्हाणे यांनी बॅचलर रोड परिसरात तयार होत असलेली सिमेंट नाली, सिमेंट रस्ता, दुभाजक, झालेल्या बांधकामावर मजबुतीकरणासाठी होत असलेला पाण्याचा कमी वापर, रस्त्याच्या मधोमध असलेले विद्युत खांब आदींबाबत डेबळवार यांना माहिती दिली. शिवाय गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणीही केली. मुख्य अभियंता डेबळवार यांच्यासोबत चंद्रपूरचे अधीक्षक अभियंता डी.के. बालपांडे उपस्थित होते.चर्चेच्या वेळी वर्धेचे कार्यकारी अभियंता शरद चौधरी, अभियंता मून, न.प. बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सुधीर फरसोले, महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे, न.प. उपाध्यक्ष प्रदीप ठाकूर, न.प.चे माजी बांधकाम सभापती निलेश किटे आदी उपस्थित होते.१२.३० ची वेळ असताना तब्बल २ वाजता ‘एन्ट्री’दुपारी १२.३० वाजता येणारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुपारी २ वाजताच्या सुमारास वर्धा शहरात दाखल झाले. इतकेच नव्हे तर बॅचलर रोडवर प्रतीक्षेत असलेल्या आ.डॉ. पंकज भोयर, माजी आमदार डायगव्हाणे यांच्याकडे बघूनही न बघितल्याचे दर्शवित या अधिकाºयांनी थेट आर्वी नाका चौक तथा पावडे नर्सिंग होम चौक गाठला. येथून यू-टर्न घेऊन पुन्हा एकदा सदर अधिकारी न्यू आर्टस् महाविद्यालयापर्यंत गेले. तब्बल २० मिनीट चाललेल्या या प्रकारात आजी-माजी आमदारांना अधिकाºयांची प्रतीक्षा करावी लागली. शिवाय एसी कारमधूनच पाहणी केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.पाहणीच्या नावाखाली पलायनचआजी-माजी आमदारांशी चर्चेनंतर अधिकाऱ्यांच्या चमूला पत्रकारांनी पाहणी दरम्यान काय त्रूटी आढळल्या, असा प्रश्न केला असता अद्याप पाहणी करायची असल्याचे मुख्य अभियंता डेबळवार यांनी सांगितले. चर्चेनंतर पाहणीच्या नावावर आजी-माजी आमदारांच्या तावडीतून सुटका करून घेत अधिकाऱ्यांनी थेट विश्रामगृह गाठले होते; पण त्यानंतरही प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.वीज खांब हटविण्याबाबत घेतली माहितीचर्चेत मुख्य अभियंता डेबळवार यांनी रस्त्याचे अर्धेधिक काम झालेल्या धंतोली चौक ते आर्वी नाका चौक दरम्यानचे विद्युत खांब काढण्याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता देशपांडे यांनी धंतोली चौक ते आर्वी नाका चौक दरम्यान भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम झाले आहे. आर्वी नाका ते धुनिवाले चौक मार्गावर भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्याचे काम नालीचे काम झाल्यानंतर केले जाईल. सदर विद्युत खांब न.प. प्रशासनाने काढून घ्यावेत, असे सांगितले.नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायच्या असल्याने आपण पूर्वीच माजी आमदार डायगव्हाणे यांच्या मुलाच्या दवाखान्याजवळ पोहोचलो होतो. सदर अधिकारी बाहेर जिल्ह्यातील असल्याने व त्यांच्या वाहनात स्थानिक अधिकारी नसल्याने ते आपण उभ्या असलेल्या जागेवर थेट पोहोचू शकले नाही. या प्रकाराला ताटकळत ठेवल्याचा प्रकार म्हणता येणार नाही.- डॉ. पंकज भोयर, आमदार, वर्धा.