शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डकॉनच्या विरोधात रत्नापूरवासी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:09 IST

चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले.

ठळक मुद्देगाड्या अडवून आंदोलन : दीड महिन्यापासून पाणीपुरवठा ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : चार पदरी रस्त्याचे सिमेटीकरणाचे काम सुरु असून या रस्ताचे व पुलाच्या बांधकामादरम्यान रत्नापूर गावाला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. दीड महिना लोटूनही कंत्राटदार दिलीप बिल्डकॉन कंपनीने ही पाईपलाईन दुरुस्त केली नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सरपंच सरपंच शाहीन अयुबअली व बाजार समितीचे संचालक अयुबअली पटेल यांच्या नेतृत्वात रत्नापूर जवळ रविवारी रस्तारोको आंदोलन केले. यावेळी बिल्डकॉन कंपनीचे वाहने अडवून कामही बंद पाडल्याने दोन दिवसात काम करण्याचे हमीपत्र दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.वर्धा ते यवतमाळ या महामार्गाचे चौपदरीकरण व सिमेंटीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यालगत असलेले रत्नापूर हे गांव दोन भागात विभागाले असून चौपदरी रस्त्याच्या एका बाजुला जुन्या वस्तीत पाणी पुरवठ्याची विहीर आहे. तर दुसऱ्या बाजुला नवीन वस्तीत पाण्याची टाकी आहे. या टाकीत विहिरीवरुन पाणी जमा होतात. त्यानंतर गावाला पुरवठा केल्या जातो. पाणी पुरवठ्याची ही पाईपलाईन चौपदरी रस्त्यातून आरपार गेली असल्याने या रस्त्याच्या व पुलाच्या बांधकामात ती वारंवार फुटत आहे. मागील दीड महिन्यापूर्वी ही पाईपलाईन फुटल्याने बांधकाम करणाऱ्या बिल्डकॉन कंपनीने दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे मागील दीड महिन्यापासून गावातील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शेतीच्या कामाच्या दिवसांमध्ये पाण्याकरिता महिलांना भटकंती करावी लागत असल्याने गावात संताप व्यक्त होत आहे. गावातील जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार सूचना करुनही कंपनीने लक्ष दिले नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी सकाळपासूनच या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. कंपनीचे टिप्पर, जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर तसेच कर्मचारी व अधिकाऱ्यांची वाहने अडवून धरत उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. या कंपनीकडून नियम पायदळी तुडविले जात आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाची वाहतूक सुरु असल्याने रस्त्यांची वाट लागली आहे. कंपनीकडून दबावतंत्राचा वापर होत असल्याने प्रशासनामध्येही हतबलता पाहवयास मिळत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. या आंदोलनात उपसरपंच शालीक मांगुळकर, ग्रा.प. सदस्य राधा कुडमथे, जयमाला खडसे, रंजना तोडासे, उमेश कुमरे, माजी सरपंच बाबाराव शेंदरे, शामराव खडसे, नंदा मांगुळकर व गावकºयांनी सहभाग घेवून प्रशासनाचे लक्ष वेधले.