शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जुवाडी फाटा ते आलोडी रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:34 IST

जुवाडी फाटा येथून धानोली हे गाव दोन किमी अंतरावर आहे. या दोन किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बांधकाम उपविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांची रहदारी धोक्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांची रहदारी धोक्यात : बांधकाम उपविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : जुवाडी फाटा येथून धानोली हे गाव दोन किमी अंतरावर आहे. या दोन किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. बांधकाम उपविभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांची रहदारी धोक्यात आली आहे. मागील ५ ते ६ वर्षांत एकदाही रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. यामुळे नागरिक त्रस्त असून रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.जुवाडी फाटा ते धानोली मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला आहे. दगड व सळाखी उघड्या पडल्या आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या गावात बस जातच नाही. दुचाकी, आॅटो व बैलबंडी एवढी अल्प प्रवासी वाहतूक सुरू आहे. तीन-चार वर्षांपासून रस्ता उखडला असताना दुरूस्तीसाठी कुणीही पुढाकार घेतल्याचे दिसत नाही. ग्रामस्थांनी अनेकदा रस्ता दुरूस्तीची मागणी केली. निवेदने दिली; पण त्याचा उपयोग झाला नाही. रस्त्याच्या देखभाल, दुरूस्तीचे काम बांधकाम उपविभाग सेलूकडे आहे. उपविभागीय अभियंता रस्त्याची पाहणी करण्यासाठीही येत नाही. सदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असून पुलाला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. असे असले तरी बांधकाम उपविभागाला जाग आलेली नाही. याकडे लक्ष देत डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.