शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याचे खस्ताहाल; वहिवाटीस अडसर

By admin | Updated: March 30, 2015 01:49 IST

इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत.

वर्धा : इतवारा येथून सेवाग्राम रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाने वहिवाट करणे वाहन धारकांसाठी डोकदुखी ठरत आहेत. हा मार्ग अरूंद असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. काही भागात रस्त उखडला असून मुरूम बाहेर पडला आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. या रस्त्याच्या दुरूस्तीकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.या रस्त्याने प्रवासी वाहतूक अधिक होते. सेवाग्राम रेल्वेस्थानक येथून बसस्थानकाकडे जाण्यासाठी पूर्वी हाच एकमेव मार्ग होता. कालांतराने विविध मार्ग विकसित झाले. त्यामुळे या रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिल्याने डांबरीकरण उखडले आहे. तसेच यातून गिट्टी, मुरूम बाहेर पडल्याने वाहने नादुरुस्त होण्याचा धोका असतो. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात वाहन चालकांना अपघात होतो. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी प्रशासनाचे निवेदनातून लक्ष वेधले. मात्र अद्याप या रस्त्याची डागडूजी झालेली नाही. सेवाग्राम रेल्वेस्थानक ते वर्धा बसस्थानक, इतवारा परिसराला जोडणाऱ्या या रस्त्याने प्रवासी, विद्यार्थी ये-जा करतात. रात्रीला या मार्गाने प्रवास धोकादायक ठरतो. येथे पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने काळोख असतो. यात अभद्र घटना होण्याची शक्यता असते. या मार्गाचे मजबुतीकरण करण्याची मागणी आहे.(स्थानिक प्रतिनिधी)