शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

२० कोटींतून साकारणार रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:38 IST

शहरातील रस्त्यांच्या विकासाचे पर्व सध्या सुरू आहे. बॅचलर रोड, शहरातून बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) कडे जाणाऱ्या रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले. धुनिवाले मठ ते शिवाजी चौकापर्यंच्या रस्त्याचाही कायापालट करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोन वर्षांची मुदत : महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंत सिमेंटीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील रस्त्यांच्या विकासाचे पर्व सध्या सुरू आहे. बॅचलर रोड, शहरातून बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) कडे जाणाऱ्या रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले. धुनिवाले मठ ते शिवाजी चौकापर्यंच्या रस्त्याचाही कायापालट करण्यात येणार आहे. तत्पूर्वी महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. २० कोटी रुपयांतून हा चार पदरी रस्ता साकारला जात आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून रस्ते विकासावर भर दिला जात आहे. शहरातील धुनिवाले मठ ते पावडे नर्सिंग होम चौकापर्यंतच्या सिमेंट रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलावरून बोरगाव व सावंगीकडे उतरणाऱ्या रस्त्यांचेही सिमेंटीकरण केले जात आहे. यानंतर आता महात्मा गांधी पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि तेथून बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आलेले आहे. या रस्त्यासाठी २० कोटी रुपयांचे प्राकलन तयार करण्यात आले असून कामाला प्रारंभ करण्यात आलेला आहे. हा रस्ता चार पदरी सिमेंटचा होत असून यात रस्त्याच्या दुतर्फा नाली, रस्ता दुभाजक आणि पादचारी रस्त्याचाही समावेश राहणार आहे.या रस्त्याच्या कामाचे कंत्राट कोल्हापूर येथील लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग प्रा.लि. या कंपनीला देण्यात आलेले आहे. या कंपनीमार्फत दर्जेदार रस्त्याची निर्मिती करून घेण्यावर भर देण्यात येणार असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. या रस्ता कामावर अभियंत्यांची देखरेख राहणार असून मार्ग प्रशस्त, सुसज्ज व सुंदर करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. रस्ता दुभाजकावर पथदिवे लावून प्रकाशाची सोय करण्यात येणार आहे. शहराला ‘स्मार्ट सिटी’चा ‘लूक’ देण्याचे प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहेत. सदर रस्त्याच्या कामामध्ये सुमारे २४ वृक्षांची कटाई करावी लागणार आहे. वृक्ष न कापता रस्त्याचे बांधकाम शक्य नसल्याने नाईलाज म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानक दरम्यान कापलेल्या वृक्षांच्या दहा पट वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचेही अधिकारी सांगतात.सर्व सिमेंट रस्त्यांची कामे झाल्यानंतर शहर स्वच्छ, सुंदर करण्याकरिता सुशोभिकरणाची कामे हाती घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. असे असले तरी काम दर्जेदार व्हावे म्हणून विभागाने लक्ष ठेवणे क्रमप्राप्त ठरणार आहे.पथदिवे व वृक्षांमुळे शहराचा होणार कायापालटमहात्मा गांधी पुतळा ते बसस्थानकापर्यंत चार पदरी रस्त्याच्या बांधकामास प्रारंभ झाला आहे. यात रस्ता दुभाजकांची निर्मितीही करण्यात येणार असून मधोमध पथदिवे लावण्यात येणार आहेत. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा पादचाºयांसाठी मार्ग ठेवण्यात येणार असून वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. २४ वृक्ष कापावे लागणार असल्याने त्याच्या दहा पट वृक्षांची लागवड या मार्गाच्या दुतर्फा करण्यात येणार आहे. पथदिव्यांचा प्रकाश आणि वृक्षांमुळे शहराचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. बांधकाम विभागही प्राकलनाप्रमाणे रस्त्याच्या निर्मितीकडे लक्ष देऊन आहे. नागरिकांना या रस्त्याची प्रतीक्षा असल्याचे दिसते.दर्जेदार कामांसाठी ‘वॉच’ गरजेचाशहरात सर्वत्र रस्ते विकासाची कामे सुरू आहेत. धुनिवाले मठ ते पावडे नर्सिंग होम चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम प्रगतिपथावर आहे; पण या रस्त्यांची निर्मिती दर्जेदार व्हावी म्हणून बांधकाम विभागाने प्रयत्न करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी पुतळा ते बसस्थानक, हा रस्ता मुख्य रस्ता राहणार असल्याने या रस्त्याच्या दर्जेदार निर्मितीवर बांधकाम विभागाने ‘वॉच’ ठेवणे गरजेचे राहणार आहे.