शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

घोराड येथील नदी घाटाचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 22:25 IST

विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

ठळक मुद्देपर्यटन विकास विभागाकडून २६३ कोटी रूपये मंजूर

ऑनलाईन लोकमतवर्धा : विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील मंदिर परिसराला लागून असलेल्या नदी घाटाच्या विकासासाठी पर्यटन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून सर्व घाटाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे बोर नदीच्या पात्रातील या घाटांचे रूप पालटणार आहे. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत २६३ लक्ष रूपये निधी पर्यटन व उर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांनी मंजूर केला आहे.घोराड येथे दरवर्षी केजाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा केला जातो. विविध धार्मिक कार्यक्रम यानिमित्ताने येथे पार पडतात. त्या दृष्टीकोनातून येथे आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. यात बोर नदी पात्राचे सौंदर्यीकरण व घाट बांधकाम तसेच शौचालय बांधकामसाठी ३६.६२ लाख, चेजिंग रूमसाठी ८१.९५ लाख, घाट पायºया ५५ लाख, भू सपाटीकरण व बगीचा कामासाठी ३४. १० लाख, अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण यासाठी १० टक्के २०.७६ लाख, प्रकाश व्यवस्था १०.३८ लाख असा निधी खर्च करण्यात येणार आहे. यातील ३० लाखांची रूपयांची रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळती करण्यात आली आहे. ३१ मार्च २०१८ पूर्वी या कामांना सुरूवात केली जाणार असल्याची माहिती आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिली. आ. डॉ. पंकज भोयर यांच्या मते या निधीतून घोराड गावाला पर्यटनाच्या दृष्टीने नवीन ओळख मिळून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पर्यटन विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. शिवाय प्रत्येक क्षेत्र विकासासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.देऊळ परिसराचाही होणार विकासबोर नदीच्या काठावर असलेल्या घोराड येथील श्री संत केजाजी महाराज यांचे मंदिर हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच विठ्ठल रूख्माई मंदिरही आहे. याशिवाय अनेक मंदिरांचा समूह बोरनदीच्या घाटाला लागूनच आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टीने कामे करताना या मंदिर परिसराच्या सभोवताल कामे होण्याची शक्यता आहे. तीन टप्प्यात हा निधी वितरित केला जाणार असून पहिल्या टप्प्यातील निधीतून मार्च महिन्यापूर्वी कामे सुरू होणार आहेत.