आर्वी पालिका ठोठावणार दंड : कारवाईच्या भीतीने दुकानदार धास्तावलेसुरेंद्र डाफ - आर्वीफळभाजी विक्रेत्यांकडून दर दिवशी होणाऱ्या प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरामुळे पर्यावरण तसेच आरोग्यास अपायकारक असल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाने पुन्हा नव्याने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. यात आर्वी नगर परिषदेने पाऊल उचलत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या थैल्या वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्लस्टिक थैली वापरणाऱ्या दुकानदार, भाजी विक्रेते, फळविक्रेत्यावर कारवाई म्हणून १०० ते १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.आर्वीसह शहरातील तालुक्यातील सर्व किराणा दुकानदाराकडे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या सर्रासपणे वापरात येत आहे. त्याचा आरोग्यासह पर्यांवरणावर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले. दर दिवशी या प्लास्टिक पिशव्यांची विल्हेवाट कशी लावावी याची डोकेदुखी आर्वी पालिका प्रशासनासमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या वापरावर बंदी आणल्यावरच प्रतिबंध बसू शकतो, असे पालिकेच्या लक्षात आल्याने हा निर्णय घेण्यात आला. आरोग्यावर व पर्यावरणावर विपरीत परिणाम करणाऱ्या या प्लास्टिकच्या थैल्यांवर शासनाने बंदी आदेश काढला; परंतु त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा सर्रास वापर सुरू असल्याचे चित्र सर्वत्र आपल्याला दिसून येते. माहिती होऊनही कारवाई करण्यावर शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे अनेकवेळा समोर आले. दर आठवडी बाजारात ग्राहकांकडून वापरण्यात येणाऱ्या या प्लास्टिक पिशव्यांचे ढीग आर्वीत ठिकठिकाणी पाहायला मिळतात. तर नाल्यामध्ये त्या अडकून बसल्याने नाल्या तुंबतात. याची विल्हेवाट लावण्यासाठी कारवाई करण्याकरिता आर्वी पालिकेच्या या प्लास्टिक पिशव्यांचा खच गावाबाहेर सर्वत्र दिसून येतो. याच ढिगावर मोकाट जनावरे ताव मारत असतात. यात अनेक जनावरे प्लास्टिक खाऊन दगावल्याची उदाहरणे आहेत. आर्वी-वर्धा मार्गावर व आर्वी-पुलगाव मार्गावर या प्लास्टिक पिशव्यांचा खच दिसून येत असल्याने बाहेरगावाहून येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना या अस्वच्छतेचे दर्शन घडते. त्याची विल्हेवाट बंदी घातल्यावरच लागू शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे. शासनाने या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालूनही त्याचा सर्वत्र वापर होतो; परंतु न.प. प्रशासन, अन्न व औषध खाद्य विभाग यांनी या वापरावर बंदी घालण्यास कारवाई गरजेची आहे. शासन अपयशी ठरत आहे; यामुळे आर्वी पालिकेने त्याची अंमलबजावणी करण्याचवा निर्णय घेतला आहे. नियमबाह्य रित्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्लास्टिक निर्मूलनाबाबत कठोर
By admin | Updated: November 3, 2014 23:29 IST