शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

येळाकेळीच्या गिट्टीखदानवर तहसीलदारांसोबत राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 23:25 IST

विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार एम. ए. सोनोने यांनी आपल्या चमुसह येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनमर्जी कारभार सुरू असल्याचे लक्षात येताच तहसीलदानांनी नियमानुसार कारवाई करण्याची इच्छा दर्शविताच चक्क तहसीलदारांसोबतच वाद घालण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच वेळी सावंगी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.

ठळक मुद्देपोलिसांना केले पाचारण : परिसरात तयार झाली होती तणावाची परिस्थिती
<p>लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : विना रॉयल्टी गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार एम. ए. सोनोने यांनी आपल्या चमुसह येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मनमर्जी कारभार सुरू असल्याचे लक्षात येताच तहसीलदानांनी नियमानुसार कारवाई करण्याची इच्छा दर्शविताच चक्क तहसीलदारांसोबतच वाद घालण्यास सुरूवात करण्यात आली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याच वेळी सावंगी पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.येळाकेळी येथील गिट्टीखदान परिसरात अवैध उत्खनन केले जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली. त्या आधारे तहसीलदार सोनोने यांच्या चमुने थेट येळाकेळी येथील गिट्टीखदान गाठून काही वाहनांची तपासणी केली. यावेळी एक वाहन विना रॉयल्टी तर दुसऱ्याची मुदत संपल्याचे आढळून आले. याच वेळी काही अवैध उत्खन्न माफियांनी वाहनचालकांना हाताशी घेत तहसीलदारांसोबत वाद केला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून येळाकेळी येथे महसूल अधिकाºयांनी सावंगी पोलीसांना घटनेची माहिती देत त्यांना घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी पोलिसांची चमु येण्यापूर्वीच तहसीलदार सोनोने यांच्या चमुने घटनास्थळावरून काढता पाय घेतला, हे विशेष.‘त्या’ ठरावांना पाठगिट्टीखदान कायमस्वरूपी बंद करावी अशा आशयाचा ठराव येळाकेळी ग्रा.पं.मध्ये घेवून तो संबंधितांना पाठविण्यात आला आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्षच करण्यात धन्यता मानली जात आहे. उल्लेखनिय म्हणजे ग्रा.पं.ने एक-दोन वेळा नव्हे तर चक्क चार वेळा सदर ठराव घेतला असल्याचे सांगण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार आपण वाहनांची तपासणी केली. त्यात एक वाहन विना रॉयल्टी तर दुसºया वाहन चालकाजवळ असलेल्या रॉयल्टीची मुदत संपली असल्याचे दिसून आले. घटनास्थळी तणावाच स्थिती निर्माण झाल्याने सावंगी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.- एम. ए. सोनोने, तहसीलदार सेलू.येळाकेळी येथील गिट्टीखदान कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी वेळोवेळी ग्रा.पं.मध्ये ठराव घेवून संबंधितांना पाठविण्यात आले आहेत. तेथे होणाºया स्फोटामुळे अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. शिवाय वयोवृद्ध व रुग्णांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाठविलेल्या ठरावांकडे पाठ दाखविण्यातच धन्यता मानली जात असून आजच्या घटनेला खाबुगिरी प्रवृत्तीच जबाबदार आहे.- रविशंकर वैरागडे, सरपंच येळाकेळी.