वर्धा : ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची सुरुवात केली आहे. जिल्हास्तरावर उमेद अभियानाच्या माध्यमातून गावस्तरावर विविध गटाची बांधणी करण्यात आली असून संघ तयार करण्यात आले आहेत. सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील अभियानाचा आढावा घेण्याकरिता जि.प. सीईओ नयना गुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी सभा घेण्यात आली. उज्वल प्रभाग काम जाणून घेण्याकरिता उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.विमला, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन माहिती जाणून घेतली. सभेला जिल्हा व्यवस्थापक मनीष कावडे, सोनाली भोकरे, अमोलसिंग रोटोले, अमोल भागवत, प्रवीण भांडारकर, हिमानी राजपूत, अविनाश गोहाड, तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, हेमंत काकडे, कल्पना खोबे यांची उपस्थिती होती. जिल्हास्तरावरून होणाऱ्या कामाची पाहणी तसेच येळाकेळी येथील उज्वल प्रभाग संघाचे गावात कार्यरत असलेले विविध समुदाय, संसाधन व्यक्ती यांची माहिती गुंडे यांनी घेतली. जिल्ह्यातील सेलू, देवळी, वर्धा तालुक्यामध्ये एकूण ५ हजार ६९३ गट, ३३६ ग्रामसेवा संघ, १७ प्रभाग संघ तयार करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. प्रभाग संघाची व समुदाय संसाधन व्यक्ती यांची कार्यप्रणाली आर.विमला, नयना गुंडे यांना भेटीदरम्यान सांगण्यात आली. यावेळी महिलांसोबत मान्यवरांनी संवास साधला. गावातील ग्रामसंघ व प्रभाग संघातील महिलांनी उत्साहीपणे कामाची माहिती दिली. यामध्ये समुदाय संसाधन व्यक्ती पे्ररिका, लेखापाल, पशुसखी, कृषीसखी, समुदाय पशुधन व्यवस्थापक, वर्धिनी, लघु उद्योग सल्लागार यांच्या कार्यप्रणालीची माहिती घेतली. या उपक्रमात तालुका व्यवस्थापक दिनेश आरसे, युसुफ शेख, कुंदा देवतळे, संघटिका कल्पना खोबे, ग्रामसचिव चव्हाण यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सोनू बारसागडे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रभाग संघाचे पदाधिकारी सरला भांडेकर, भारती चलाख, करलुके, लेखापाल वैशाली डोंगरे, प्रेरिका यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
उज्ज्वल प्रभाग संघाचा सीईओंकडून आढावा
By admin | Updated: September 19, 2016 00:52 IST