शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रसामग्री व पुरवठ्याची रक्कम जाणार परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 23:08 IST

दुधाळ जनावरांपैकी गवळाऊ गार्इंची प्रजात कायम राखण्यासाठी असलेला हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुन्हा धोक्यात आला आहे. या केंद्राकरिता यंत्रसामग्री आणि इतर साहित्य पुरविण्याकरिता आलेल्या १२ लाख रुपयांपैकी ९ लाख रुपये नियोजनाअभावी अखर्चित आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या उदासीनतेमुळे गवळाऊ गार्इंच्या प्रकल्पाचा बोजवारा

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दुधाळ जनावरांपैकी गवळाऊ गार्इंची प्रजात कायम राखण्यासाठी असलेला हेटीकुंडी येथील शासकीय पशुपैदास केंद्र जिल्हा प्रशासनाच्या उदासिनतेमुळे पुन्हा धोक्यात आला आहे. या केंद्राकरिता यंत्रसामग्री आणि इतर साहित्य पुरविण्याकरिता आलेल्या १२ लाख रुपयांपैकी ९ लाख रुपये नियोजनाअभावी अखर्चित आहे. सध्या फेबुवारी महिना सुरू झाल्याने ही रक्कम खर्च होणे शक्य नसल्याने ती आता परतीच्या मार्गावर आहे.कारंजा तालुक्यात हेटीकुंडी येथे गवळाऊ गायींचे शासकीय पशुपैदास केंद्र निर्माण करण्यात आले. शासकीय असलेल्या या केंद्राकडे मध्यंतरी सर्वांचे दुर्लक्ष झाले. त्यानंतरच्या काळात शासनाच्यावतीने या केंद्राला पुन्हा जीवित करण्याकरिता अनुदान दिले. मात्र जबाबदारी असलेल्या अधिकाºयांकडून याकडे कामय दुर्लक्ष झाले. यामुळे प्रकल्पाची असलेली दैना कायम आहे. परिणामी येथून गवळाऊ गायींचे संगोपण होईल अथवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या येथे असलेल्या जनावरांच्या सुविधा पुरविण्याकरिता आवश्यक असलेली यंत्रसागम्री आणि औषधसाठा खरेदी करण्याकरिता शासनाच्यावतीने यंदाच्या आर्थिक वर्षात १२ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले होते. यातून प्रकल्पाकरिता काही आधुनिक साहित्य खरेदी करण्याकरिता ही रक्कम खर्च होणे अपेक्षित होते. मात्र जबाबदारी असलेल्या अधिकाºयांच्या नियोजनशुन्यतेमुळे आलेल्या अनुदानापैकी केवळ तीन लाख रुपयेच खर्च झाले. उर्वरीत रक्कम खर्च होणे आता शक्य नसल्याने ती रक्कम परत जाण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात एकमेव असलेल्या या शासकीय प्रकल्पाप्रती शासकीय अधिकारी किती गंभीर आहेत. याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.केंद्रात १२४ जनावरेसुमारे शंभर एकरात विस्तारीत असलेल्या या केंद्रात आजच्या घडीला १२४ जनावरे असल्याचे पशुसंवर्ध विभागाकडून सांगण्यात आले आहे. या जनावरांचे संगोपण आणि त्यांची देखभाल करण्याकरिता या केंद्रात मोठी यंत्रणा देण्यात आली आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे येथील जनवरांची हालत खस्ता झाली आहे. त्यांना पोषक आहारही येथे दिल्या जात नसल्याची ओरड आहे. यामुळे जनावरे कुपोषित होत असल्याची ओरड आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देत कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.चाऱ्याच्या आगीबाबतचा तपास थंडावलागत दोन महिन्यापुर्वी येथे असलेल्या चारा प्रकल्पाला आग लागली होती. या आगीवर येथे कार्यरत कर्मचाºयांनी महावितरणच्या अधिकाºयांच्या माध्यमातून ताबा मिळविला होता. यात बहुतांश चारा बचावला. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी हा प्रश्न लावून धरला होता. या सर्व प्रकाराला येथे असलेल्या व्यवस्थापनाचा गलथान कारभार एक कारण असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हा प्रकार थांबविण्याकरिता या प्रकल्पाची नागपूर येथील अधिकाºयाकडे असलेली जबाबदारी काढून ती जिल्ह्याच्या अधिकाºयाकडे सोपविण्याचा ठराव झाला होता. तो ठराव पशुसंवर्धन आयुक्तालयाकडे पाठविण्यात आला होता. मात्र त्यावर अद्याप कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या येत्या सभेत प्रश्न उपस्थित करणे गरजेचे झाले आहे.कारभार चालतो नागपुरातूनया प्रकल्पाची जबाबदारी असलेले डॉ. सतीश राजू हे नागपूर वळू संगोपण केंद्रात प्रक्षेत्र व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या दर्जाचे वर्धा जिल्ह्यात एकूण पाच अधिकारी आहेत. डॉ. राजू नागपुरात असल्याने त्यांच्याकडून या प्रकल्पाकडे विशेष लक्ष देणे शक्य नाही. तरीही ते जमेल तसे प्रकल्पाला भेट देत आपली जबाबदारी पार पाडतात. यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करून ही जबाबदारी वर्धेतील अधिकाºयावर सोपविल्यास प्रकल्पाकडे लक्ष देता येईल असे येथील अधिकारी बोलत आहेत.