शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसाचा वर्धा जिल्ह्यातील संत्राबागांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:03 IST

तळेगाव तालुक्यातील संत्रा पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील ७२ हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून यापैकी ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या फळबागांतील संत्रा फळाला गळती लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ठळक मुद्देतळेगाव परिसरात संत्रा फळगळ मोठ्या प्रमाणातकृषी विभागाकडुन पंचनामे करणे सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: तळेगाव तालुक्यातील संत्रा पिकाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. या भागातील ७२ हेक्टर क्षेत्र संत्रा लागवडीखाली असून यापैकी ५० ते ६० टक्के शेतकऱ्यांच्या फळबागांतील संत्रा फळाला गळती लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.तळेगाव, चिस्तूर, रानवाडी, बेलोरा, भिष्णूर, खडका, आनंदवाडी, भारसवाडा आदी गावांतील ७२ हेक्टर क्षेत्रात संत्र् याच्या बागा आहेत. त्यात सध्या अंबिया बहारचा संत्रा होता. मात्र परतीच्या पावसाने त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला व संत्रा पीक गळून पडू लागले. सप्टेंबर आॅक्टोबर महिन्यात पावसाचे पाणी बागेत साचल्याने फळांच्या देठांजवळ बुरशी येते व फळ गळून पडते. साचलेले पाणी बाहेर निघण्यास कुठूनच मार्ग नसल्याने हे पाणी जमिनितच मुरत राहते. यंदा ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. या पिकाच्या नुकसानाचा पंचनामा करून भरपाई मिळावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे.

टॅग्स :agricultureशेती