शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अल्प मनुष्यबळ सांभाळतेय जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाही सुसज्ज असणे गरजेचे आहेत. पण, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याने तोकड्या मनुष्यबळावरच आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागत आहे.

ठळक मुद्देकोरोनामुळे यंत्रणेवर आलाय ताण : जिल्हा आरोग्य यंत्रणेतील ३१ टक्के जागा रिक्तच

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोनाकाळात आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या आरोग्य विभागाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वारंवार रिक्तपदाच्या भरणा करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवूनही त्याला मंजुरी मिळत नसल्याने आता आरोग्याचा डोलारा सांभाळताना मोठी अडचण निर्माण झाली आहे. ऑक्सिजन मिळेल, व्हेंटिलेटरचीही व्यवस्था होईल पण, लागणारे मनुष्यबळ आणणार कु ठून असा प्रश्न आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यातील अल्प मनुष्यबळच दीड वर्षापासून आरोग्याची जबाबदारी भक्कमपणे सांभाळत आहे. पण, अखेर तेही मनुष्यच असल्याने त्यांचीही सहनशक्ती संपायला लागली आहे.जिल्ह्यातील १५ लाख ७८ हजार ६२० नागरिकांना मोफत आणि चांगली आरोग्य सेवा देण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांवर आहेत. नागरिकांना वेळीच उत्तम सुविधा मिळण्याकरिता आरोग्य यंत्रणाही सुसज्ज असणे गरजेचे आहेत. पण, शासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे शहरी व ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील तब्बल ३१ टक्के पदे रिक्त असल्याने तोकड्या मनुष्यबळावरच आरोग्याचा डोलारा सांभाळावा लागत आहे. जिल्ह्याला सावंगी आणि सेवाग्राम येथील दोन रुग्णालयाचा आधार असल्याने आतापर्यंत आरोग्य यंत्रणा सदृढ होती. पण, या कोरोनाच्या दुसऱ्या लाटीत आरोग्य यंत्रणा खालावलेली दिसून येत आहे. कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी गावापासून तर शहरापर्यंत आरोग्य कर्मचारी दिवसरात्र झटत आहे. पण, मोठ्या लोकसंख्येपुढे ही तोकडी आरोग्य यंत्रणा आता कमी पडत आहे. कोरोनासोबत इतरही आजारावर नियंत्रण मिळवायचे असल्याने गेल्या दीड वर्षांपासून आरोग्य विभागात काम करणारे कर्मचारी घायकुतीस आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य विभागातील पदे भरली नसल्याने आता आरोग्यबाबत हयगय होत आहे. नागरिकांच्या आरोग्याबाबत कुठलीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा दम देणाऱ्या लोकप्रतिनिधींनीही यासाठी कधी पुढाकार घेतलेला दिसला नाही. या महामारीतून अनुभव घेत आधी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्याची गरज व्यक्त होत आहे.

आरोग्य विभागातील बहूसंख्य पदे रिक्त आहेत. त्यामुळे या कोरोनाकाळात यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. तरीही रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, याकरिता आहे त्या मनुष्यबळाच्या आधारे अहोरात्र आरोग्य सेवा दिली जात आहे. रिक्त पदे भरण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आले पण, पदे भरली नाही. परिणामी आता कोणत्याही रजा न घेता काम करावे लागत आहे.डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने रिक्तपदे भरण्याकरिता वारंवार निवेदनातून शासन व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली. परंतु अनेक वर्ष मंजूर पदाची जिल्हा प्रशासनाकडून बिंदूनामावली करण्यात आली नाही. तसेच २२११ लेखाशिर्ष अंतर्गत पदाचा घोळ सुटलेला नाही.दिलीप उटाणे, राज्य कार्याध्यक्ष,   जि.प.आराेग्य सेवा कर्मचारी संघटना, वर्धा

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या