शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

गांधींच्या स्वप्नातील रामराज्याचा संकल्प करा

By admin | Updated: January 14, 2015 23:12 IST

समाजातील ही अंध:कार दूर व्हावा याच दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. आम्ही चांगले तर सारं जग चांगले. हीच प्रेरणा घेवून व संकल्प ठेवूनच कार्य केले पाहिजे. उत्तम कार्य करून इतरांना प्रेरणा

सुधीर मुनगंटीवार : सेवा व विद्याभूषण पुरस्कार वितरण सोहळावर्धा : समाजातील ही अंध:कार दूर व्हावा याच दिशेने आम्ही कार्य करीत आहोत. आम्ही चांगले तर सारं जग चांगले. हीच प्रेरणा घेवून व संकल्प ठेवूनच कार्य केले पाहिजे. उत्तम कार्य करून इतरांना प्रेरणा देण्याचे काम सेवार्थींनी केलेले आहे. समाजऋण समजून देशाप्रती कार्य केले पाहिजे. महात्मा गांधींच्या स्वप्नातील रामराज्य आणण्याचा संकल्प करावा, असे आवाहन वित्त व नियोजन मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.जय महाकाली शिक्षण संस्थेच्यावतीने अग्निहोत्री कॉलेज कॅम्पस येथे बुधवारी संक्रांती स्रेहमिलन व सेवा सत्कार समारोहात कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी मुख्य अतिथी मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूरचे न्यायमूर्ती अरूण चौधरी, राष्ट्रपती पुरुस्कृत हास्य व व्यंग्य शिल्पी प्रा. मधुप पांडेय, हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार व चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष गयाचरण त्रिवेदी तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शंकरप्रसाद अग्निहोत्री विराजमान होते. यावेळी आठ जणांचा सेवा, तर १६ जणांना विद्याभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. न्यायमूर्ती अरुण चौधरी यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अग्निहोत्री म्हणाले, नव्या सरकारकडून विदर्भ विकासासोबत वर्धा जिल्हाचा विकासची अपेक्षा आहे. यावेळी राष्ट्रपती पुरुस्कृत हास्य व व्यंग्य शिल्पी प्रा. मधुप पांडेय यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला संस्था सचिव शिवकुमारी अग्निहोत्री, पूजा अग्निहोत्री, रमेश मुरडीव, महेश त्रिवेदी, डॉ. राजीव त्रिवेदी उपस्थित होते. याप्रसंगी संस्थेच्यावतीने ना. मुनगंटीवार यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह तसेच मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संस्थेचे सहसचिव सचिन अग्निहोत्री यांनी केले, तर संस्थेचा आढावा प्रा. प्रफुल्ल दाते यांनी मांडला.(जिल्हा प्रतिनिधी)