शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

४,७१५ व्यक्तींचा नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 00:41 IST

नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने ..

ठळक मुद्देपंधरवड्याचा समारोप : नेत्रदात्या कुटुंबीयांसह दहा व्यक्तींना केले सन्मानित

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नेत्रदान व अवयवदानासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने प्रभावी जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृती पंधरवाड्यादरम्यान नागरिकांना अवयवदान व नेत्रदानाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आल्याने जिल्ह्यातील ४ हजार ७१५ व्यक्तींनी नेत्रदानासह अवयवदानाचा संकल्प सोडला. सदर जनजागृती पंधरवाड्याच्या समारोपीय कार्यक्रमादरम्यान नेत्रदात्यांच्या कुटुंबियांसह दहा व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.अवयवदान व नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे आठ व्यक्तींना जीवनदान मिळते. तसेच एका व्यक्तींच्या नेत्रदानामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळत असल्याने सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पुढाकाराने विविध सामाजिक संघटनांचे सहकार्य घेत प्रभावी कार्य केले जात आहे. यंदा २५ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान विविध ठिकाणी महत्त्व पटवून देण्यात आल्याने ४ हजार ६७८ व्यक्तींनी नेत्रदानाचा तर ३७ व्यक्तींनी अवयवदानाचा संकल्प फार्म भरून दिला आहे.उल्लेखनिय म्हणजे यंदाच्या जनजागृती पंधवाड्यादरम्यान दोन व्यक्तींनी मरणोपरांत नेत्रदान केल्याने चार नेत्र बुबुळे संकलित झाले आहे. नेत्रदान व अवयवदान जनजागृती पंधरवाडा उपक्रमाचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक पुरुषोत्तम मडावी यांच्या अध्यक्षतेत पार पडला.सदर कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर वैद्यकीय जनजागृती मंचचे डॉ. सचिन पावडे, डॉ. मकरंदे, सक्षमचे सुधीर गंधे, डॉ. विनोद वाघमारे, भारती पुनसे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर कार्यक्रमादरम्यान नेत्रदात्यांच्या कुटुंबियांसह उल्लेखनिय कार्य करणाºया एकूण दहा जणांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.हिंगणघाट पंचायत समिती मधील गटशिक्षणाधिकारी लिलाधर बारसागडे यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी लिलाधर बारसागडे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वत: पुढाकार घेत काही शिक्षकांसह शिक्षकांच्या कुटुंबातील सदस्यांचे असे एकूण १ हजार २५० व्यक्तींकडून नेत्रदानाबाबतचा संकल्प फार्म भरून घेतला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प सोडावा यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रफुल्ल काकडे, भारती नंदनवार, अनिल वरघट यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा प्रयत्न करीत आहे.