शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

पुलाच्या दुरुस्तीचे कामही दर्जाहीन

By admin | Updated: January 12, 2016 01:59 IST

सेलू ते हिंगणी या मार्गावरील किन्ही गावालगतचा पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता.

ग्रामस्थांची ओरड : एकाच पावसात पूल वाहून जाण्याची भीतीबोरधरण : सेलू ते हिंगणी या मार्गावरील किन्ही गावालगतचा पूल अपघाताला निमंत्रण देणारा ठरत होता. यासंदर्भात लोकमतने वृत्त प्रकाशित करताच बांधकाम विभागाने पुलाची दुरूस्ती केली. पण नव्याने झालेले पुलाचे कामही दर्जाहिन झाल्याची ओरड नागरिकांद्वारे व प्रवाश्यांद्वारे होत आहे. सेलू ते हिंगणी हा मार्ग बोरधरणकडे जाणाऱ्या पर्यटकांसह नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सोयीचा आहे. नागपूर करिता हा मार्ग जवळचा असल्याने या मार्गावरून दिवसभर प्रवाशांची वर्दळ असते. बोर अभयारण्याला भेट देण्याकरिता येणाऱ्या पर्यटकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या रस्त्यावर सर्वत्र वाहनांची गर्दी वाढू लागली आहे. अशातच रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या शेतातील पाणी नदीपात्रात वाहून जाण्यासाठी असलेल्या किन्ही गावाजवळील लहान पुलाची अत्यंत दुरवस्था झाली होती. रस्त्याखालून सिमेंट पायल्या टाकून सदर पूल तयार करण्यात आला होता. वाढलेल्या वाहतुकीमुळे तीन ते चार वर्षांपूर्वी पुलाच्या दोन्ही बाजू खचल्या होत्या. त्यामुळे पूल नरजेस पडत नव्हता. रात्रीला अपघाताच्या घटना वाढू लागल्या होत्या.यासंदर्भात लोकमतने काही दिवसांपूर्वी बातमी प्रकाशित करताच सदर पुलाचे काम नव्याने करण्यात आले. नवीन पायल्या टाकण्यात आल्या. परंतु पायल्या टाकताना केवळ माती टाकून तकलादू काम करण्यात आले. यामुळे दुरुस्तीचे कामही निकृष्ठ केल्याने या कामाचा फायदा काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. केवळ माती व मुरूम टाकण्यात आल्याने येथे वाहने घसरण्याची शक्यता बळावली आहे. तसेच एकाच पावसात नालीसहीत रस्त्याच वाहून जाण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्यामुळे या पुलाचे पक्के बांधकाम करून मागणी होत आहे. अपघाताची शक्यता लक्षात घेता ही गरज व्यक्त होत आहे.(वार्ताहर) अपघाताचा धोका कायमतुटलेल्या पुलाचे काम करताना तेथीलच माती टाकून पुलाचे तात्पुरते काम करण्यात आले. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. नवीन पायल्या टाकताना जोत्याचा भर टाकणे आवश्यक असताना तसे न करताच पायल्या टाकण्यात आल्या. एवढेच नव्हे तर पायल्या पायल्या घसरू नये यासाठी सिमेंट काँक्रीट टाकणे आवश्यक असतानाही केवळ माती व मुरूम टाकण्यात आले. त्यामुळे हा पूल केव्हा खचून जाईल याचा नेम नाही. रोजचे पाणी वाहून जातानाही यातील माती वाहून जात आहे. त्यामुळे पुढे जाऊन मोठा धोका निर्माण होण्याचे शक्यता बळावली आहे. पुलाची अवस्था पाहता एकाच पावसात हा पूल वाहून जाण्याची शक्यता असल्याचे प्रवासी व ग्रामस्थ सांगत आहेत. पक्के बांधकाम करण्याची मागणीबोरधरणकडे जाणाऱ्या पर्यटकांसह नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा पूल सोयीचा आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते.रात्रीलाही हा रस्ता वाहता असल्याने हा पूल धोक्याचा ठरत आहे. त्यामुळे सदर पुलाचे पक्के बांधकाम करण्याची मागणी होत आहे.