शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 22:20 IST

शहरात भुयारी गटार योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याकरिता सिमेंटचे रस्ते फोडण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने फोडलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगरविकासच्या प्रधान सचिवांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.

ठळक मुद्देनगरविकास सचिवांचे आदेश : भुयारी गटार योजना

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात भुयारी गटार योजनेंतर्गत मलवाहिनी टाकण्याकरिता सिमेंटचे रस्ते फोडण्यात आल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने फोडलेल्या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगरविकासच्या प्रधान सचिवांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.शासनाच्या अमृत योजनेंतर्गत वर्धा नगरपालिकेच्यावतीने भूमिगत पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. ही दोन्ही कामे सध्या रेंगोळलेली असून याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटदार आपल्याच मनमर्जीने काम करीत असल्याने नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन या कामाची चौकशी करून कामाला गती देण्याची मागणी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. यावरून मुंबई येथे नगरविकासचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेत बैठक बोलावण्यात आली होती.या बैठकीला आमदार डॉ. पंकज भोयर, नगराध्यक्ष अतुल तराळे, नगर विकासचे सहसचिव पां. जो. जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सतीश सुशीर, अधीक्षक अभियंता एस. के. नंदनवार, वर्धा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे तसेच वर्धा येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता वाघ यांची उपस्थिती होती.तर नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करापाणीपुरवठा योजनेमध्ये सुमारे ४० कि.मी. वितरण व्यवस्थेचे काम हायड्रोलिक टेस्टिंगअभावी अपूर्ण आहे. त्याकरिता आवश्यक स्पेशल्स उपलब्ध झालेले नाहीत, अशी माहिती दिल्यानंतर नगरपालिका व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने यासंदर्भात बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करावे. ही कार्यवाही करणे शक्य नसल्यास सध्याच्या कंत्राटदाराच्या रिस्क अ‍ॅण्ड कॉस्टवर निर्णय घेऊन नवीन कंत्राटदाराकडून काम करण्यासंदर्भात जीवन प्राधिकरणने निर्णय घ्यावा. तो निर्णय पालिकेला कळवावा आणि पाणीपुरवठ्याचे सर्व काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना प्रधान सचिवांनी दिल्या.कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकासध्याच्या कंत्राटदाराने कामात चालढकल केल्यास नवीन कंत्राटदाराची नियुक्ती करावी. त्यानंतर सध्याच्या कंत्राटदाराला संपूर्ण राज्यभरासाठी काळ्या यादीत टाकण्यासंदर्भात पालिकेने कार्यवाही सुरू करावी. त्याचप्रमाणे संबंधित कंत्राटदार हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नोंदणीकृत कंत्राटदार असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानेदेखील त्याला संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळ्या यादीत टाकावे, असेही सुचित करण्यात आले.मलनिस्सारणे काम कालमर्यादेत व्हावेभुयारी गटार योजनेचे काम मंदगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे मलवाहिनी टाकलेल्या रस्त्याचे तत्काळ सिमेंटीकरण करून ते काम जून अखेरपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावे. तसेच ही योजना ३१ जुलैपर्यंत कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचनाही पालिका व जीवन प्राधिकरणने कंत्राटदाराला देण्याचे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक